Pune NIBM Road | एनआयबीएम येथील २७ सोसायट्यांनी पाण्याच्या टँकर्ससाठी 9 वर्षात मोजले 100 कोटी रुपये !

पाणी पुरवठ्यासाठी नागरिकांनी घेतली महापालिका अधिकार्‍यांची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune NIBM Road | उन्हामुळे होरपळून निघत असताना उपनगरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. महापालिकेकडे दररोज तक्रारींचा पाउस पडत आहे. अनेक ठिकाणी तीन ते चार दिवस पाणी येत असल्याच्या तक्रारी येत असून टँकरचालकही अधिकचे दर लावत असल्याच्या तक्रारींचाही यामध्ये समावेश आहे. अनेक वर्षे पाण्याची समस्या नसताना नव्याने पाणी टंचाई जाणवू लागल्याने डेक्कन परिसरातील नागरिकांनीही ‘नो वॉटर नो वोट’ (No Water No Vote) असे फलक लावले आहेत. तर आज गेली नउ वर्षे कोट्यवधी खर्च करून टँकरने पाणी विकत घेणार्‍या कोंढव्यातील एनआयबीएम पुढील तब्बल २७ सोसायट्यांतील प्रतिनिधींनी पाण्यासाठी पाणी पुरवठा विभागात (Pune Water Supply) ठाण मांडले होते.

शहराच्या हद्दवाढीसोबत पाण्याची मागणी वाढली आहे. चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असून अद्याप ही योजना पुर्णत: कार्यन्वीत झालेली नाही. अशातच नव्याने गावे समाविष्ट झाल्याने तेथील पाणी पुरवठ्याची जबाबदारी महापालिकेवर आल्याने चांगलीच कसरत पाहायला मिळत आहे. अशातच यंदा मार्चच्या मध्यापासूनच कडक उन्हाळा सुरू झाला असून गेली आठ दिवस शहरातील तापमान ४० अंश सेल्सियसच्या आसपास राहील्याने पाण्याची मागणी वाढली आहे. यंदा प्रथमच टँकरची रोजच्या खेपांची संख्या साडेबाराशेच्या पुढे गेली आहे. यापैकी काही टँकर्स महापालिकेचे असून त्याद्वारे मोफत पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र, बहुतांश ठिकाणी खाजगी टँकरने पाणी पुरवठा होतो. या टँकर्सचे दर दुप्पट झाले आहेत, अशा तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पाणी वेळेत मिळावे या गरजेपोटी नागरिकांना चढ्या दराने पैसे देण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, मनसेचे नेते बाबु वागसकर आणि शहरअध्यक्ष साईनाथ बाबर यांनी कोंढव्यातील एनआयबीएम परिसरातील २७ सोसायट्यांच्या प्रतिनिधींसोबत पाणी पुरवठा विभागचे अधीक्षक अभियंता नंदकुमार जगताप यांची भेट घेतली. गेली नउ वर्षे येथील २७ सोसायट्यातील सुमारे पाच हजार फ्लॅटधारक टँकरने पाणी खरेदी करत आहेत. येथील पाणी पुरवठा व्यवस्थेचा विकासच झालेला नाही. त्यामुळे काही सोसायट्यांमध्ये दरमहा अगदी तीन हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत मेन्टेंनन्स द्यावा लागतो, अशी तक्रार या शिष्टमंडळातील नागरिकांनी केली. या सर्व सोसायट्यांनी मिळून आतापर्यंत तब्बल शंभर कोटी रुपये खर्च केवळ पाण्याच्या टँकरसाठी केला आहे. याउपर महापालिकेचा मिळकत कर नियमीतपणे भरण्यात येत आहे. महापालिकेला मिळकत करातून कोट्यवधीचा महसुल देत असताना पिण्याचे पाणी मिळत नसल्याचा संताप शिष्टमंडळातील महीला सदस्यांनी व्यक्त केला.

एनआयबीएम येथील एक पाईपलाईन जोडण्याचे काम प्रगती पथावर आहे.
या लाईनच्या जोडणीत काही तांत्रिक अडथळे आले होते.
हे अडथळे दूर करून येत्या एक दोन दिवसांत हे काम पुर्ण करून ट्रायल घेण्यात येईल.
या लाईनमुळे या सोसायट्यातील पाण्याचा प्रश्‍न काही अंशी सुटण्यास मदत होईल.
जेणेकरुन टँकरवरील खर्च कमी होईल, असे आश्‍वासन अधीक्षक अभियंता नंदकुमार जगताप यांनी शिष्टमंडळाला दिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अभिलाषा मित्तलने उचललं टोकाचं पाऊल, हत्या कि आत्महत्या?

Mahavitran’s EV Charging Station In Pune | महावितरणचे विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन आता सौर ऊर्जेवर ! पुण्यातील सौर प्रकल्पाची संचालक प्रसाद रेशमे यांच्याकडून पाहणी

Pune Mahavitaran News | महापारेषणच्या लोणीकंद उपकेंद्रात बिघाड; चाकण एमआयडीसी पसिरात वीज खंडित