Pune Pimpri ACB Trap Case | देहुरोड विभागाचे ACP मुगूटलाल पाटील यांच्याकरिता 5 लाखाच्या लाचेची मागणी; 1 लाखाचा पहिला हप्ता घेताना ओंकार जाधव अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : नितीन पाटील – Pune Pimpri ACB Trap Case | जागेसंबंधात फसवणुकीचा तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा (Cheating Fraud Case) दाखल न करण्यासाठी व मदत करण्यासाठी देहुरोड विभागाचे (Dehu Road ACP) सहाय्यक पोलिस आयुक्त मुगूटलाल पाटील (ACP Mugutlal Patil) यांच्याकरिता 5 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून 1 लाख रूपये घेणार्‍यास अ‍ॅन्टी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनमध्ये (Koregaon Park Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Bribe Case)

ओंकार भरत जाधव Omkar Bharat Jadhav (32, व्यवसाय – चालक, रा. फ्लॅट नं. 1105, वस्तुविवा सोसायटी, वाकड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्याविरूध्द पिंपरी-चिंचवड पोलिस (Pimpri Chinchwad Police) आयुक्तालयातील देहुरोड विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे कात्रज-कोंढवा बायपास रोडवरील (Katraj Kondhwa Bypass Road) जागेसंबंधात फसवणुकीचा तक्रार अर्ज आला होता. सदरील तक्रार अर्जाची चौकशी सहाय्यक पोलिस आयुक्त मुगूटलाल पाटील यांच्याकडे सुरू होती. सदरील तक्रारी अर्जामध्ये तक्रारदार यांच्याविरूध्द भादंवि कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल न करण्यासाठी व मदत करण्यासाठी 5 लाख रूपयाच्या लाचेची मागणी लोकसेवक सहाय्यक आयुक्त मुगूटलाल पाटील यांच्या सुचनेवरून ओंकार भरत जाधव यांनी केल्याबाबतची तक्रार अ‍ॅन्टी करप्शनकडे प्राप्त झाली होती.

सदरील तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष दि. 15, दि. 16 आणि दि. 17 फेबु्रवारी 2024 रोजी करण्यात आली. त्यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त मुगूटलाल पाटील यांच्याकरिता ओंकार जाधवने 5 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून दि. 17 फेबु्रवारी 2024 रोजी लाचेचा पहिला हप्ता म्हणुन 1 लाख रूपयाची लाच पुण्यातील जहाँगिर हॉस्पीटलच्या पार्किंगमध्ये पंचासमक्ष घेतली. त्यावेळी ओंकार जाधवला अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे (Addl SP Sheetal Janve)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक नितीन जाधव (DySP Nitin Jadhav),
पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे (PI Prasad Lonare),
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मुकुंद आयाचित, पोलिस हवालदार चंद्रकांत जाधव
आणि पोलिस अंमलदार दिनेश माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Inspector Transfers | चतुःश्रृंगी, लष्कर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : बेकायदेशीर गांजा बाळगणाऱ्या दोन महिलांना अटक, सव्वा लाखांचा गांजा जप्त