Pune Pimpri Chinchwad Crime | विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल फिमध्ये अपहार, डी.वाय.पाटील कॉलेजच्या कर्मचाऱ्यावर FIR

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | विद्यार्थ्यांच्या पालकांनी हॉस्टेलसाठी भरलेले पैसे कॉलेजच्या बँक खात्यात जमा न करता तीन लाखांचा अपहार केला (Embezzlement in Fees). याप्रकरणी कॉलेजच्या कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2023 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत मावळ तालुक्यातील वराळे येथील डी.वाय.पाटील कॉलेज (DY Patil Collage) येथे घडला आहे.

याबाबत डॉ. सुशांत विजयकुमार पाटील (वय-41 रा. सुप्रीम पाम, बालेवाडी, पुणे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Talegaon MIDC Police Station) फिर्याद दिली. यावरुन तुषार सुंदरबापु क्षीरसागर (रा. वराळे) याच्यावर आयपीसी 420, 506, 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुषार हा वराळे येथील डी. वाय. पाटील एम.बी.ए. कॉलेज येथे काम करतो.
आरोपीने कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या व ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल मध्ये प्रवेश घेयचा आहे, अशा विद्यार्थ्यांचे पैसे
कॉलेजच्या बँक खात्यात न भरता त्याचा परस्पर अपहार केला. तुषार याने क्यूआर कोडचा वापर करून त्याद्वारे
स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर केले. याबाबत विचारणा केली असता आरोरावीची भाषा करत पैसे देणार नाही काय करायचे
ते करा, मी घाबरत नाही कोणाला, असे म्हणून बघून घेतो अशी धमकी दिली. आरोपीने हॉस्टेल व्यवस्थापन व विद्यार्थ्यांच्या
पालकांची 2 लाख 97 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Sahakar Nagar Police | व्यसनाच्या आहारी गेलेल्या उच्च शिक्षीत वाहन चोराला सहकारनगर पोलिसांकडून अटक, तीन दुचाकी जप्त

Pune Rural Police | चोरी करुन वृद्ध महिलेचा खून करणाऱ्या दाम्पत्याला अटक, पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये चोरी करणाऱ्याला लोहमार्ग पोलिसांकडून अटक, नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

गांजाची तस्करी करणाऱ्या सिव्हील इंजिनिअरसह तिघांना गुन्हे शाखेकडून अटक, 27 किलो गांजा जप्त

पुणे : उसने दिलेले पैसे परत मागितल्याने महिलेला अश्लील मेसेज करुन धमकी, दोघांवर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल