Pune Pimpri Chinchwad Crime News | आरोपीला भेटू न दिल्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, खडकी पोलीस ठाण्यातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | खडकी पोलीस ठाण्यातील (Khadki Police Station) लॉकअपमध्ये असलेल्या आरोपीला भेटू न दिल्याने महिला पोलीस शिपाई यांना धक्काबुक्की करुन धमकावले. याप्रकरणी खडकी पोलिसांनी एका महिलेवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.10) दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास खडकी पोलीस ठाण्यातील लॉकअप जवळील ठाणे अंमलदार कक्षात घडला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत महिला पोलीस शिपाई शिवानी शिवाजी जगताप Police Constable Shivani Shivaji Jagtap (वय-29) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन रिना उर्फ हिना फकीरा तायडे (वय-31 रा. महादेववाडी, खडकी बाजार, पुणे) हिच्यावर आयपीसी 353, 332, 506, सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपी महिला रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती खडकी पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार सागर चांदणे हा खडकी पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये बंद आहे.
आरोपी महिला सागर याला भेटण्यासाठी खडकी पोलीस ठाण्यात आली होती.
त्यावेळी फिर्यादी या अंमलदार कक्षात सरकारी दैनंदिन काम करत होत्या.
त्यांनी आरोपी महिलेला सागर चांदणे याला भेटता येणार नाही असे सांगितले.
याचा राग आल्याने रिना उर्फ हिना तायडे हिने फिर्यादी यांच्यासोबत वाद घालून त्यांना धक्काबुक्की केली.
तसेच धमकावून फिर्यादी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
रिना तायडे हिच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पोलीस असल्याचे सांगून तपासणी करण्याच्या बहाण्याने जेष्ठ नागरिकाला लुटले, चाकण एसटी स्टँड समोरील घटना

पत्नी अन् सासरच्या लोकांनी तरुणाला पाजले विष, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; बालेवाडी येथील घटना

Aaditya Thackeray | आमदार पात्रता निकालावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, ”देशासाठी हे मोठे संकेत आहेत…”