Pune Pimpri Chinchwad Crime News | पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करुन गाडीवर दगडफेक, हडपसर परिसरातील घटना; 7 जणांना अटक

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करुन पोलिसांच्या सी आर मोबाईल वाहनावर दगडफेक केल्याची घटना रामटेकडी येथे घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि.10) पहाटे तीनच्या सुमारास रामटेकडी येथील वंदे मातरम चौकात घडली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पोलीस अंमलदार अभिजीत बाळासाहेब चव्हाण यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station)
फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अभिजीत अशोक काकडे (वय-19 रा. रामटेकडी, हडपसर), बल्या गायकवाड
(रा. कृष्णानगर, कोंढवा), नितीन पाटोळे (रा. आदिनाथ बिल्डींग, रामटेकडी), महेश शिंदे, बाळा, प्यारी उर्फ प्रशांत कांबळे,
पप्पुसिंग गुरबचनसिंग कल्याणी (वय-19 रा. हडपसर) यांना अटक केली असून इतर दोन ते तीन जणांवर आयपीसी 353,
143, 147, 149, 427, 336, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमीनल लॉ अमेंन्डमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस अंमलदार अभिजीत चव्हाण व त्यांचे सहकारी सहायक पोलीस फौजदार
जगताप हे भैरोबानाला परिसरात पेट्रोलिंग करत होते.
त्यावेळी एमडीटीवर प्राप्त झालेल्या कॉलनुसार फिर्यादी हे रामटेकडी येथील वंदेमातरम चौकात गेले. त्यावेळी आरोपी हे गैरकायद्याची मंडळी जमा करुन रस्त्यावरचे फळ विक्रीच्या गाड्या पलटी करत होते.
त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीपैकी एकाने फिर्यादी यांना ढकलून दिले.
तसेच आरोपींनी त्याठिकाणी पार्क केलेल्या रिक्षा, दुचाकी, चारचाकी गाड्यांवर दगडफेक करुन दहशत निर्माण केली.
तर अभिजीत काकडे याने सी आर मोबाईल व्हॅनवर दगड मारुन समोरील काच फोडली. आरोपींनी फिर्यादी हे करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पोलीस असल्याचे सांगून तपासणी करण्याच्या बहाण्याने जेष्ठ नागरिकाला लुटले, चाकण एसटी स्टँड समोरील घटना

पत्नी अन् सासरच्या लोकांनी तरुणाला पाजले विष, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; बालेवाडी येथील घटना

Aaditya Thackeray | आमदार पात्रता निकालावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, ”देशासाठी हे मोठे संकेत आहेत…”