Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यात शाळकरी मुलाला पट्ट्याने मारहाण करुन चाकूने भोसकले, चार जण ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यात शाळकरी मुलांनी एकाला गज, पट्ट्याने बेदम मारहाण करुन चाकूने वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ही घटना पुण्यातील रामोशी गेट परिसरात मंगळवारी (दि.30) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी चार मुलांना ताब्यात घेतले आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत जखमी झालेल्या 15 वर्षीय मुलाने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन चार अल्पवयीन मुलांवर आयपीसी 307, 323, 504, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलगा भवानी पेठेतील रामोशी गेट परिसरात असलेल्या महापलिकेच्या शाळेत दहावीत आहे. तर आरोपी अल्पवयीन मुले देखील याच परिसरातील उर्दू शाळेत दहावीत शिकत आहेत. तक्रारदार मुलाची एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून एका मुलासोबत दोन दिवसांपूर्वी वाद झाले होते. त्यानंतर अल्पवयीन मुलाने या घटनेची माहिती शाळेतील मित्रांना दिली.

मंगळवारी (दि.30) दुपारी साडेतीनच्या सुमारास फिर्य़ादी मुलगा रामोशी गेट परिसरातून जात होता.
त्यावेळी चार जणांनी त्याला अडवून शिवीगाळ केली. तुझे बहुत मस्ती आयी है. दादागिरी करता है क्या? असे म्हणत
लोखंडी रॉड, लोखंडी सळई, लेदर बेल्टने मुलाच्या दोन्ही हातावर, मानेवर मारहाण केली.
त्यानंतर चाकूने छातीच्या उजव्या बाजूला भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा
Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळ खून प्रकरण : कुख्यात गुंड गणेश मारणेला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संगमनेर येथून ओला-उबेर गाडीतून जात असताना घेतलं ताब्यात

Maharashtra Police Officer Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील विशेष पोलीस महानिरीक्षक, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

स्वारगेट एसटी स्टॅन्डच्या परिसरातून प्रवाशांचे दागिने चोरणार्‍या महिलेला स्वारगेट पोलिसांकडून अटक