Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळ खून प्रकरण : कुख्यात गुंड गणेश मारणेला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संगमनेर येथून ओला-उबेर गाडीतून जात असताना घेतलं ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शरद मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सुत्रधार आणि कुख्यात गुंड गणेश मारणेला (Ganesh Marne) संगमनेर परिसरातून ओला-उबेर गाडीतून जात असताना ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गणेश मारणेचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं आहे.

शरद मोहोळ खून प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत 15 जणांना अटक केली आहे. गणेश मारणे हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता. त्याच्या मागावर गुन्हे शाखेचे पोलिस होते. अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याचा नाशिक येथून पाठलाग सुरू केला. एकुन 3 पथके त्याचा पाठलाग करीत होती. अखेर त्याला संगमनेर परिसरातून ताब्यात घेतलं आहे. त्याच्यासह त्याच्या साथीदारांना देखील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले

पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्‍हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक

Female Dead Body Found On Metro Site | धक्कादायक! मेट्रो साइटवर सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, खुनाचा संशय