Pune Pimpri Chinchwad Crime News | मंदिरात दान करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला लुटले, धायरी येथील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मंदिरात दान करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करुन लुटण्याच्या घटना पुणे शहरात घडत आहेत. अशीच एक घटना धायरी परिसरात घडली आहे. दत्त मंदिरात दान करण्याच्या बहाण्याने दोन तरुणांनी एका ज्येष्ठ नागरिकाकडून सोन्याची अंगठी घेतली. त्यानंतर हातचलाखीने अंगठी लंपास करुन ज्येष्ठाची 90 हजार रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केली. हा प्रकार बुधवारी (दि.23) दुपारी एकच्या सुमारास धायरी येथील पोकळे एम्पायर समोर घडली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत नामदेव गोविंदा पोकळे (वय-70 रा. पोकळे वडापाव, गणेश नगर, धायरी) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) गुरुवारी (दि.25) फिर्याद दिली आहे. यावरुन 25 ते 30 वर्षाच्या वयोगटातील दोन आरोपींवर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी फिर्य़ादी यांच्या जवळ येऊन त्यांचे चुलते वारले असल्याचे सांगितले. तसेच त्यांना दत्त मंदिरात दान करायचे असल्याचे सांगून दत्त मंदिर कुठे आहे अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांच्याजवळ असलेली पाचशे रुपयांची नोट फिर्यादी यांना दाखवली. या नोटेवर सोने घासायचे असल्याचे सांगून फिर्यादी यांच्याकडून त्यांच्या बोटात असलेली 20 ग्रॅम वजनाची अंगठी मागितली.

फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून 90 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी आरोपींकडे दिली.
त्यानंतर त्या दोघांनी सोन्याची अंगठी पाचशे रुपयांच्या नोटेवर घासून अंगठी नोटेवर ठेवली.
त्यानंतर नोटेची घडी घालून पैसे मंदिरात दान करा असे सांगितले. दरम्यान, चोरट्यांनी फिर्यादी यांचे लक्ष विचलीत
करुन हातचलाखीने अंगठीच्या ऐवजी दगड नोटेत ठेवला. त्यानंतर चोरट्यांनी फिर्यादी यांची सोन्याची अंगठी घेऊन
पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नामदेव पोकळे यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | येरवडा परिसरातील अट्टल गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची 97 वी कारवाई

पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल, तरुणावर FIR

Pune News | गुड न्यूज! पुणे, पिंपरी-चिंचवड पाठोपाठ आता तिसरी महापालिका, जिल्ह्यातील ‘या’ गावांचा समावेश