Pune Police MPDA Action | येरवडा परिसरातील अट्टल गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची 97 वी कारवाई

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MPDA Action | येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार शाहरुख सईद खान Criminal Shah Rukh Saeed Khan (वय- 27 रा. नागपुर चाळ, येरवडा, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (Pune Police MPDA Action) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 97 वी कारवाई आहे.

शाहरुख खान हा येरवडा पोलीस ठाण्यातील (Yerwada Police Station) रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने लोणीकंद व येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवली आहे. आरोपीने त्याच्या साथीदारांसह पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तलवार, कोयता, यासारख्या हत्यारांसह दुखापत, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्यावर मागील तीन वर्षात 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ADV

आरोपी शाहरुख खान याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम
यांनी पोलीस आयुक्त यांना पाठवला होता.
प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शाहरुख खान याला
एम.पी.डी.ए. कायद्यान्वये चंद्रपूर मध्यवर्ती कारागृह (Chandrapur Central Jail), चंद्रपूर येथे एक वर्षासाठी
स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

ही कमगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे शाखा, पी.सी.बी. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे,
पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Congress News | आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन कॉंग्रेस करणार; श्रेय उपटण्याची भाजपची संतापजनक धडपड – माजी नगरसेवक दत्ता बहिरट