Pune Pimpri Chinchwad Crime News | तोंडावर लाल तिखट टाकून तरुणाच्या गळ्यावर वार, पुण्यातील आपटे रोडवरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी एका तरुणाच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार आपटे रोडवर रविवारी (दि.4) रात्री साडे अकराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी शशांक दिलीप शिरोळे (वय-31 रा. कमल निवास, आपटे रोड, पुणे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन दोन अनोळखी व्यक्तींवर आयपीसी 324, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास शशांक शिरोळे हे त्यांच्या घराच्या गेटजवळ थांबले होते. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ आल्या. त्यांनी काहीएक कारण नसताना शशांक यांच्या तोंडावर लाल तिखट टाकून धारदार हत्याराने गळ्यावर वार करुन जखमी केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत करीत आहेत.

टेम्पोची काच फोडून हत्याराने मारहाण

पाषाण : चार जणांनी एका टेम्पोची पुढील काच फोडून चालकाला धारदार हत्याराने मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार पाषाण येथील सुस रोडवर रविवारी (दि.4) सायंकाळी पाच ते सात या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी विजय सुखदेव लोहकरे (वय-30 रा. सुस गाव, पुणे) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी राजेश राठोड (रा. पाषाण) व त्याच्या इतर तीन साथीदारांवर आयपीसी 324, 323, 504, 34 सह महाराष्ट्र
पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या
ओळखीचे आहेत. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फिर्य़ादी सुस रोड येथील एका बेकरी समोर टेम्पो
लावून थांबले होते. त्यावेळी आरोपी त्यांच्या जवळ आले. त्यांनी टेम्पोची पुढील काच फोडून नुकसान केले.
तसेच आरोपीने धारदार लोखंडी हत्याराने हातावर व खांद्यावर मारुन जखमी केले.
तर आरोपीच्या इतर मित्रांनी लाकडी बांबूने मारहाण केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तीन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य, नराधमास अटक; कोंढवा परिसरातील प्रकार

Maharashtra Police Suicide News | गळफास घेऊन पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

पुणे : अश्लील हावभाव करुन महिलेचा विनयभंग, पतीला जीवे मारण्याची धमकी