Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : अश्लील हावभाव करुन महिलेचा विनयभंग, पतीला जीवे मारण्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करुन विनयभंग (Molestation Case) केला. तर पोलीस ठाण्यात गेला तर मर्डर करेन अशी धमकी महिलेच्या पतीला दिली. हा प्रकार गुलटेकडी येथील ढोले मळा येथे रविवारी (दि.4) रात्री पावणे बाराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करुन एकला अटक केली आहे. ( Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत ढोले मळा येथे राहणाऱ्या 34 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन ऋषीकेश दिनेश खिलारे (वय-22 रा. खिलारे वस्ती, गुलटेकडी) याला अटक केली आहे. तर पियुष पवार (वय-23 रा. डायस प्लॉट), रोहित उर्फ कोळसा व एका अनोळखी तरुणावर आयपीसी 354, 354अ, 509, 323, 506/2, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋषिकेश खिलारे याने फिर्यादी यांच्या घराजवळ असलेले सिमेंटचे पोते
शेकोटी करण्यासाठी घेत होता. त्यावेळी फिर्यादी यांनी सिमेटचे पोते घेण्यास नकार दिला.
याचा राग आल्याने आरोपीने महिलेला अश्लील शिवीगाळ करुन अंगावर धावून गेला.
महिलेचा हात पकडून त्यांच्यासोबत लगट करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
तसेच महिलेकडे पाहून अश्लील हातवारे केले. हा वाद सुरु असताना महिलेचे पती बाहेर आले.
त्यावेळी आरोपीने त्यांना शिवीगाळ करुन मर्डर करण्याची धमकी दिली.
तर आरोपीच्या इतर साथीदारांनी हातात लोखंडी हत्यारे घेवुन तु जर पोलीस स्टेशनला गेला तर तुझा मर्डर करीन अशी
धमकी दिली. तसेच त्याठिकाणी पडलेला फरशीचा तुकडा उचलून मारण्यासाठी उगारला.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कोलंबीकर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune CP Amitesh Kumar | अवैध धंद्यांना मुक संमती देणार्‍या तसेच त्यामध्ये प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या सहभागी असणार्‍यांवर कठोर कारवाई करणार – पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Maharashtra IAS Officer Transfer | राज्यातील 7 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या, विभागीय आयुक्त सौरभ राव यांची बदली

Namo Maharojgar Melava | बेरोजगारांना दिलासा! राज्य सरकार आयोजित करणार ‘नमो महारोजगार मेळावे’; मंत्रिमंडळ बैठकीत २० महत्त्वाचे निर्णय

Vijay Wadettiwar On CM Eknath Shinde | ”वर्षा निवासस्थान गुंडांचे आश्रयस्थान झालेय का?”, गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावरून वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल!