Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘आज इसको जिंदा नही छोडेंगे’ म्हणत तरुणावर धारदार हत्याराने वार, गणेश पेठेतील घटना; तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणांना शिवीगाळ करुन एकावर धारदार हत्याराने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केल्याची घटना पुण्यातील गणेश पेठेतील ढोर गल्लीत घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.9) दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत भवानी पेठेत राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन नुमान नईम शिकीलकर (वय-19), हर्षद हेमंत जाधव (वय-19), श्रेयस दत्तु थोरात (वय-19) यांच्यावर आयपीसी 307, 336, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र गणेश पेठेतील ढोर गल्लीतून पायी जात होते.
त्यावेळी आरोपींनी रस्त्यामध्ये थांबून फिर्यादी याला कुठे चालला आहे अशी विचारणा करुन अश्लील शिवागाळ केली.
तसेच रस्त्यावरील दगड उचलून मारला. फिर्यादी व त्याच्यासोबत असलेल्या सात ते आठ जण शिवीगाळ केल्याचा
जाब विचारण्यासाठी आरोपीकडे गेले असता त्यांनी पुन्हा शिवीगाळ करुन ‘यहां वापस क्यू आयए मरने को’ असे
म्हणून फिर्यादी व त्यांच्या मित्रांच्या अंगावर धावून गेले. आरोपींनी अमन शेख याला ‘आज इसको जिंदा नहीं छोडेंगे’
असे म्हणत त्यांच्याकडील धारदार हत्याराने पोटावर, पाटीवर व हाथावर वार करुन गंभीर जखमी केले.
जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | कात्रज परिसरात दहशत पसरवणाऱ्या प्रवीण येणपुरे टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 113 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वारामुळे तरुणाने गमावला जीव; दोघांना अटक

Pune Cheating Fraud Case | पुणे : फ्लॅट देण्याच्या बहाण्याने एक कोटींची फसवणूक, बिल्डर सह चार जणांवर FIR