Pune Pimpri Chinchwad Crime News | डोक्यात दगड मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न, विश्रांतवाडी परिसरातील घटना; सराईत गुन्हेगार गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मुलीबद्दल वाईट बोलल्याने झालेल्या वादातून एका सराईत गुन्हेगाराने डोक्यात दगड मारुन एकाला गंभीर जखमी केले. याप्रकरणी सराईत गुन्हेगारावर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.8) सकाळी 11 वाजता येरवडा वाहतुक विभागाच्या कार्यालयासमोरील सार्वजनिक रोडवर घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

अमीर सय्यद असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार संजय लक्ष्मण बर्डे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोनु सुनिल छजलाना (वय-33 रा. भारत नगर, आळंदी रोड, येरवडा, कतार वाडी) याच्यावर आयपीसी 307, 326 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोनु आणि जखमी अमीर सय्यद हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
सोनु याने अमीरच्या मुलीबाबत अपशब्द वापरल्याने त्यांच्यात वाद झाला.
याच वादातून सोनु याने अमीर याला जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अमीर याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
पोलिसांनी सराईत गुन्हेगार सोनु याला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माळी करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | कात्रज परिसरात दहशत पसरवणाऱ्या प्रवीण येणपुरे टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 113 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वारामुळे तरुणाने गमावला जीव; दोघांना अटक

Pune Cheating Fraud Case | पुणे : फ्लॅट देण्याच्या बहाण्याने एक कोटींची फसवणूक, बिल्डर सह चार जणांवर FIR