Pune Pimpri Chinchwad Crime News | गांजा विक्री करता असे सांगून पैशांची केली मागणी; नकार देताच तरुणाला चौघांनी केली मारहाण

पुणे : तरुण गप्पा मारत बसले असताना तुम्ही गांजा (Ganja) विक्री करता असे सांगून पोलीस केस करायची नसल्यास त्या बदल्यात पैशांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांच्या अंगावर पुड्या टाकून त्याचे व्हिडिओ रेकॉडिंग करत त्यांना मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत वडगाव शेरी येथे राहणार्‍या एका २६ वर्षाच्या तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४०/२४) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी २ पुरुष व २ महिलांवर खंडणीचा (Extortion Case) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मुंढवा रोडवरील गणेश पार्क येथे १९ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र गप्पा मारत बसले होते. त्यावेळी २ पुरुष व २ महिला तेथे आला. त्यांनी फिर्यादी यांना तुम्ही गांजा विक्री करता असे खोटे बोलून जर पोलीस केस करावयाची नसल्यास त्याबदल्यात पैशांची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांनी त्यांच्याजवळील कसल्यातरी पदार्थाच्या पुड्या फिर्यादीच्या अंगावर टाकल्या. फोनमध्ये व्हिडिओ रेकॉडिंग करुन त्याआधारे फिर्यादी विरुद्ध पोलिसांकडे खोटी केस करण्याची परत भिती घालून अधिक पैशांची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांनी दमदाटी करुन हाताने मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक माने तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मुलीच्या प्रेमसंबंधाला विरोध केल्याने आईचा कुत्र्याच्या बेल्टने गळा आवळून खून