Pune Pimpri Chinchwad Crime News | माथाडीच्या नावे खंडणी मागणारा अटकेत, लोणी काळभोर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – माथाडी संघटनेच्या नावाखाली व्यावसायिकाकडे खंडणी (Extortion Case) मागणाऱ्या 6 आरोपींवर लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. हा प्रकार उरुळी देवाची गावाच्या हद्दीत तसेच शेल पेट्रोल पंपावर 12 जानेवारी ते बुधवार (दि.17) या कालावधीत घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत मोहसिन शहाजान शेख (वय-36 रा. एन.आय.बी.एम. रोड कोंढवा, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन शेखर अनिल मोडक (वय-29 रा. वडकी) याला अटक केली आहे. तर आण्णा देवकर (रा. फुरसुंगी, हडपसर) याच्यासह इतर चार जणांवर आयपीसी 387,143, 147,149, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक असून यांचे उरुळी देवाच्या हद्दीत गोडाऊन आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या गोडावून येथे जाऊन आम्ही माथाडी बोर्डाचे नेते असल्याचे सांगितले. तसेच तुमच्या गोडावून मध्ये आमचे कामगार काम करणार असल्याचे सांगून त्यांचे काम बंद केले. काम चालु करायचे असेल तर एका गाडीमागे 15 हजार रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले तरच काम चालू करायचे असे सांगितले.

फिर्यादी यांनी मला माथाडी कामगार ठेवायचे नाहीत, ते मला परवडत नसल्याचे सांगितले. मात्र आरोपींनी निदान एका गाडीमागे सात हजार रुपये दे नाहीतर तुझ्या गोडावुनमध्ये येणाऱ्या गाड्या तु कशा खाली करतो तेच बघतो, असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांना दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी यांनी गुरुवारी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करुन शेखर मोडक याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

शिवनेरी बसच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू, स्वारगेट परिसरातील घटना