Pune Pimpri Chinchwad Crime News | किरकोळ कारणावरुन कुटुंबाला मारहाण, दोघांना अटक; हडपसर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | स्लॅबमधून पाणी गळत असल्याच्या कारणावरून दोघांनी एका युवकाला व त्याच्या आई-वडिलांना मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार हडपसर परिसरात घडला. हा प्रकार हडपसर परिसरातील पारीजात कॉलनीत 3 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोन भावांना अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत स्वप्नील ज्ञानेश्वर मोरे (वय-39 रा. पारिजात अपार्टमेंट, आकाशवानी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन ओंकार दिलीप साळुंके (वय-33), केदार दिलीप साळुंके (वय-33 रा. पारीजात कॉलनी, हडपसर) यांच्यावर आयपीसी 324, 452, 341, 352, 323, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी हे एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात. स्लॅबमधून पाणी गळत असल्याच्या कारणावरुन आरोपी फिर्यादी यांच्या घरात आले. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन वीटेने मारहाण करुन जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी यांची पत्नी, आई-वडील मध्ये आले असता त्यांनाही मारहाण केली.

फिर्यादी पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी जात होते. आरोपी केदार साळुंके याने गाडीची चावी कढून घेतली असता
फिर्य़ादी यांच्या वडिलांनी मध्यस्थी केली. याचा राग आल्याने आरोपींनी त्यांना मारहाण करुन पत्नीच्या अंगावर धावून गेला.
आरोपींनी तुझ्या पोराला मी जीवंत सोडणार नाही. त्याची मारण्याची सुपारी देतो अशी धमकी फिर्य़ादी यांच्या आईला दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalgaon Crime | वाळू माफियांचा उपजिल्हाधिकार्‍यांवर हल्ला ! उपजिल्हाधिकारी गंभीर जखमी, शासकीय वाहन, मोबाईल फोडला

पीडीसीसी बँकेच्या खिडकीचे गज तोडून चोरी ! ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस कार्यालयाची केली नासधूस

ACB Trap On Police | 15 हजारांची लाच स्वीकारताना स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यासह खासगी व्यक्ती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Lonavala Crime | लोणावळ्यात उच्च प्रतीचे विदेशी मद्य जप्त, राज्य उत्पादन विभागाची कारवाई

फेसबुकद्वारे मैत्री करुन तरुणीवर बलात्कार, मुंढवा परिसरातील प्रकार