Pune Pimpri Chinchwad Crime News | घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना महाळुंगे पोलिसांकडून अटक, एक किलो सोने जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News| महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी (Mahalunge MIDC Police Station) घरफोडी (House Burglary) करणाऱ्या एका आरोपीला अटक केली होती. आरोपीकडे असलेल्या दुचाकीच्या चाकावरुन पोलिसांनी आरोपीला 2 जानेवारी रोजी अटक केली. पोलिसांनी त्याच्या साथीदाराला देखील अटक केली आहे. दोन्हीही आरोपींकडून 45 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त करुन 18 गुन्हे उघडकीस आणले आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

आमिर शब्बीर शेख (वय-25 सध्या रा. निगडी प्राधिकरण मुळ रा. वडेश्वर काटे, वडगाव मावळ), सोहेल शफीक पठाण (वय-23 रा. खंडोबा मंदिर पायथा, निमगाव, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

खेड तालुक्यातील मोई येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांनी आमिर शेख याला 2 जानेवारी रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास अटक केली. शेख याला त्याच्याकडे असलेल्या दुचाकीच्या लाल रंगाच्या चाकावरुन अटक केली. आरोपीकडून चोरलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम व दुचाकी असा एकूण 29 लाख 3 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त केला. गुन्ह्याचा अधिक तपास करुन पोलिसांनी त्याचा साथीदर सोहेश पठाण याला अटक केली.

अटक केलेल्या आरोपींनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील येलवाडी, सदुंबरे, इंदोरी, तळेगाव दाभाडे, मोशी,
चिखली परिसरात घरफोडी केल्याचे सांगितले. चोरी करताना रस्त्यालगत असणाऱ्या बंगल्याची रेकी करुन बंगले
लॉक असताना व लाईट बंद असल्यास बंगल्याच्या मागील खिडकीचे गज कापून आत प्रवेश करून चोरी केल्याची
कबुली दिली. आरोपींकडून 45 लाख 33 हजार 400 रुपये किमतीचे 1 किलो 7 तोळे 2 ग्रॅम सोने, रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी,
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वसंत बाबर, पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी, पोलीस अंमलदार प्रदिप गायकवाड,
दिनेश चव्हाण, राजू कोणकेरी, अमोल बराटे, युवराज बिराजदार, संतोष होळकर, विठ्ठल वडेकर, राजु जाधव, संतोष काळे,
किशोर सांगळे, शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, राहुल मिसाळ,
अमोल माटे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dr Sanjeev Thakur | ललित पाटील प्रकरण : ससून रूग्णालयाचे तत्कालीन डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्याविरुद्ध पोलिसांना पुरावे मिळाले, अटक होणार?

Eknath Shinde Group | शिंदे गटाच्या मंत्र्याचे वक्तव्य, ”ठाकरे गट पुन्हा फुटणार, १४ तारखेला काय होतंय पहा…”

Uddhav Thackeray | घराणेशाहीमुळे देशाचं नुकसान, पंतप्रधानांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ”गद्दारांची घराणेशाही प्राणप्रिय…”

Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळच्या खूनासाठी मदत करणाऱ्या आणखी तिघांना अटक