Eknath Shinde Group | शिंदे गटाच्या मंत्र्याचे वक्तव्य, ”ठाकरे गट पुन्हा फुटणार, १४ तारखेला काय होतंय पहा…”

रत्नागिरी : Eknath Shinde Group | आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल (MLA Disqualification Result ) आमच्या बाजूने लागल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Uddhav Balasaheb Thackeray Group) आमदार आमच्याकडे येणार आहेत. १४ तारखेपासून काय होते ते पहा, असे वक्तव्य शिंदे गटाचे (Eknath Shinde Group) उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते मिलिंद देवरा देखील शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले, देवरा यांच्या सारख्या नेत्याची एकनाथ शिंदेंना साथ मिळाली तर मुंबईत शिवसेना भक्कम होईल. इच्छुक असल्यास त्यांनी शिंदे यांचे नेतृत्व स्विकारून बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करावा.

उदय सामंत म्हणाले, मिलिंद देवरा हे लोकांमध्ये जावून काम करणारे नेते आहेत. त्यांच्याकडे मुरली देवरा साहेबांचा वारसा आहे. अनेक माजी आमदार त्यांच्यासोबत काम करतात.

महाविकास आघाडीवर टीका करताना उदय सामंत म्हणाले, महाविकास आघाडीला पंतप्रधानपदाचा चेहरा नसल्याने
त्यांचा आम्ही विचार करत नाही. आधी त्यांनी पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करावा.
मोदींच्या विरोधात १० ते २० टक्के मतदान घेणारा चेहरा त्यांनी जाहीर करावा.
हे सैरभैर झालेत कारण यांच्याकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नाही.

उद्धव ठाकरे यांच्या आजच्या कल्याण दौऱ्याबाबत उदय सामंत म्हणाले, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात
कोणी गेले तरी काही धोका नाही. किती वेळा जायचे तेवढे जा. श्रीकांत शिंदे हे विजयाची हॅट्रीक करणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | शशिकांत बोराटे पुणे शहर वाहतूक शाखेचे नवे उपायुक्त, डीसीपी विजयकुमार मगर यांची झोन-4 म्हणून नियुक्ती

पुणे : व्याजासाठी तगादा, बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या; सावकारावर गुन्हा दाखल

ठेकेदाराकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हडपसर परिसरातील घटना

Prabha Atre Passed Away | पद्मविभूषण स्वयमयी डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Lashkar Crime News | पत्रकार असल्याचे सांगुन महिन्याला हप्त्याच्या स्वरूपात पैशाची मागणी! भुषण साळवे, संदिप रासकर आणि अक्षय वाघमारे यांच्याविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल

MP Srinivas Patils Wife Rajni Devi Passes Away | खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी यांचे निधन

Pune Police Inspector Transfer News | पुण्यातील 15 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; मुंढवा, भारती विद्यापीठ, येरवडा, अलंकार पोलीस स्टेशनचा समावेश