Pune Pimpri Chinchwad Crime News | पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद, सासरच्या लोकांकडून जावयाला दगडाने मारहाण; कोंढवा परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले. यावरुन सासरच्या लोकांनी जावयाला हाताने व दगडाने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार 17 जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान कोंढवा बुद्रुक येथील भगवा चौक येथे घरासमोर झाला. याप्रकरणी सासरे, मेहुणा व इतर दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत संतोष विलास कांबळे (वय-25 रा. भगवा चौक, कोंढवा बुद्रुक, पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सासरे अंबर सोनटक्के, मेहुणा यश सोनटक्के यांच्यासह इतर दोन अनोळखी व्यक्तींवर आयपीसी 325, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे त्यांच्या पत्नी सोबत किरकोळ कारणावरून वाद सुरु होता.
त्यावेळी फिर्यादी यांचे सासरे अंबर सोनटक्के त्या ठिकाणी येऊन का भांडताय अशी विचारणा केली.
त्यावेळी संतोष कांबळे यांच्या पत्नीने कारण नसताना त्रास देत असल्याचे आरोपी सासरे यांना सांगितले.
यावरुन सासऱ्यांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. तर मेहुणा व त्याच्यासोबत आलेल्या इतर दोन अनोळखी
व्यक्तींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन मारहाण केली.

आरोपींच्या तावडीतून पळून जात असताना आरोपींनी फिर्यादी यांना जोरात ढकलले.
त्यामुळे फिर्यादी दगडावर पडल्याने त्यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला. संतोष कांबळे यांनी जोरजोरात आरडाओरडा केला
असता आरोपी तेथून निघून गेले. जाताना त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : क्रिकेट खेळण्यावरुन तरुणांमध्ये राडा, दोघांना बेदम मारहाण; 8 जणांवर FIR

Pune ACB Trap News | पुणे: 5 लाखाच्या लाच प्रकरणात वकिल झाला मध्यस्थ; लाच घेताना वकिलासह पोलिस उपनिरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

चिंचवडमध्ये लागलेल्या आगीत दोन सख्ख्या भावांचा होरपळून मृत्यू (Video)

पुण्यात पादचाऱ्यांचे मोबाईल चोरले, तर सिंहगड रोड परिसरात फोटोग्राफरचा कॅमेरा पळवला

Pune Police MPDA Action | आंबेगाव परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 92 वी स्थानबध्दतेची कारवाई

मुंढवा पोलिसांच्या तत्परतेमुळे कर्नाटकमधील पीडित मुलगी कुटुंबियांच्या ताब्यात