Pune Police MPDA Action | आंबेगाव परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 92 वी स्थानबध्दतेची कारवाई

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MPDA Action | भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharati Vidyapeeth Police Station) हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार प्रेम अंकुश शिंदे Prem Ankush Shinde (वय-22 रा. वेताळनगर, आंबेगाव बुद्रुक, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (Pune Police MPDA Action) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 92 वी कारवाई आहे.

प्रेम शिंदे हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी कोयता, सुरा यासारख्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दुखापत, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ADV

प्रेम शिंदे याच्यावर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना
सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी प्रेम शिंदे याला
एम.पी.डी.ए कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कारवाई भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखा, पी.सी.बी. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे,
पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap News | पुणे: 5 लाखाच्या लाच प्रकरणात वकिल झाला मध्यस्थ; लाच घेताना वकिलासह पोलिस उपनिरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

चिंचवडमध्ये लागलेल्या आगीत दोन सख्ख्या भावांचा होरपळून मृत्यू (Video)

Pune Mundhwa Police | मुंढवा पोलिसांच्या तत्परतेमुळे कर्नाटकमधील पीडित मुलगी कुटुंबियांच्या ताब्यात

चिंचवडमध्ये लागलेल्या आगीत दोन सख्ख्या भावांचा होरपळून मृत्यू (Video)

पुणे : ‘धर याला, चाव, छू…’ पिटबुल कुत्रा अंगावर सोडला, मालकावर गुन्हा दाखल