Pune Pimpri Chinchwad Crime News | अनैतिक संबंधातून मित्राचा खून, मृतदेह टाकला मुळशी धरणात; हिंजवडी पोलिसांकडून आरोपीला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मित्राच्या पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून (Immoral Relationship) मित्राचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह मुळशी धरणात टाकून दिला. हा प्रकार 24 सप्टेंबर रोजी घडला. याप्रकरणी एकला अटक करण्यात आली आहे. मयत व्यक्तीच्या पत्नीने याबाबत पती बेपत्ता झाल्याची तक्रार हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) दिली होती. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

किशोर प्रल्हाद पवार (वय-35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय भास्कर खिल्लारे (वय-21 रा. बालेवाडी, मुळ रा. आसेगाव, वसमत, जि. हिंगोली) याला अटक करण्यात आली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

मयत किशोर पवार हा 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता घरात कोणास काही एक न सांगता निघुन गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आला नसल्याने त्याच्या पत्नीने 25 सप्टेंबर रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. या गुन्ह्याचा तपास करत असताना किशोर पवार हा त्याचा मित्र अक्षय खिल्लारे याच्या दुचाकीवरुन गेल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी अक्षय खिल्लारे याला ताब्यात घेऊन चोकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी अक्षय खिल्लारे याचे किशोर पवार याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. याबाबत किशोर याला माहिती झाल्याने तो दोघांवर संशय घेऊ लागला. आरोपीने किशोरला फोन करुन माझ्या मित्राचा अपघात झाला आहे माझ्यासोबत चल असे खोटे सांगून दुचाकीवरुन वारक गावातील मुळशी डॅमच्या धरणाजवळ नेले. त्याठिकाणी लघुशंका करण्याचा बहाणा करुन सोबत आणलेल्या विळ्याने किशोरच्या मानेवर व चेहऱ्यावर वार करुन खून केला. त्यानंतर मृतदेह कपड्याने बांधून मुळशी धरणाच्या पाण्यात टाकून दिला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळ करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. वसंत परदेशी,
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल दहिफळे, सोन्याबापु देशमुख
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, अजितकुमार खटाळ,
सहायक पोलीस उपनिरीक्षक बंडु मारणे, बापुसाहेब धुमाळ, बाळकृष्ण शिंदे, पोलीस अंमलदार कैलास केंगले, विक्रम कुदळ,
योगेश शिंदे, कुणाल शिंदे, सुनिल डामसे, अरुण नरळे, नरेश बलसाने, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे,
अमर राणे, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, दत्तात्रय शिंदे, सागर पंडीत यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde-Devendra Fadnavis | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना