CM Eknath Shinde-Devendra Fadnavis | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde-Devendra Fadnavis | राज्यातील राजकरणात पुन्हा एकदा हालचाली वाढल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत त्यांचे सत्तेतील सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवार नाहीत. शिंदे-फडणवीस तातडीने दिल्ली रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. (CM Eknath Shinde-Devendra Fadnavis)

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत भाजपा नेते आणि गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत. ही भेट कशासाठी आहे, याबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. या भेटीनंतर आगामी काळात राज्यातील सत्तेत काही बदल घडतील का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. (CM Eknath Shinde-Devendra Fadnavis)

दरम्यान, देवगिरी बंगल्यावर असूनही आजच्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हजर नव्हते. त्यामुळे अजित पवार नाराज आहेत, अशीही चर्चा आहे. अजित पवार यांची नाराजी आणि राष्ट्रवादीकडून वाढता दबाव, हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली भेटीचे कारण असावे, असा अंदाज काहीजण व्यक्त करत आहेत.

वर्षा बंगल्यावर गणेशोत्सवात विविध राजकीय नेते, बॉलिवूड कलाकारांनी भेट दिली. मात्र अजित पवार गेले नाहीत. तेव्हापासून अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | आंदेकर टोळीतील बंडु आंदेकर, कृष्णा आंदेकर याच्यासह 14 जणांवर FIR, जाणून घ्या प्रकरण

ससून रुग्णालयातील अनेक बड्या अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस संशयाच्या पिंजऱ्यात;
महिला पीएसआयसह 7-8 पोलिस निलंबीत?

ACB Trap News | पतसंस्था मॅनेजरकडून लाच घेताना पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Maharashtra Sr Police Officer Transfer | राज्य पोलीस दलातील अपर पोलीस अधीक्षक दर्जाच्या
अधिकाऱ्यांच्या बदल्या; बापु बांगर यांची पिंपरीत उपायुक्त म्हणुन बदली

MNS Raj Thackeray – Lok Sabha Elections | मनसेचं ‘एकला चलो रे’, लोकसभा निवडणुकीत
महाराष्ट्रातील सर्व 48 जागा लढवणार