Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारल्याने सुरक्षा रक्षकाला चाकूने भोसकले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन एका व्यक्तीला चाकूने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. हा प्रकार खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथील गवते वस्ती येथे रविवारी (दि.28) दुपारी बाराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत रमेश सुरेश भोसले (वय-55 रा. बालाजी नगर, पॉवर हाऊस, लांडेवाडी भोसरी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन कृष्णा गणेश भोसले (रा.लांडेवाडी, भोसरी) याच्यावर आयपीसी 307 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचा मुलगा आकाश याला मारहाण केली होती.
फिर्यादी यांनी याचा जाब आरोपीला विचारला. याचा राग आल्याने आरोपी कृष्णा भोसले यांने त्याच्याजवळ असलेल्या
चाकूने फिर्यादी यांच्या पोटात डाव्या बाजूला भोसकले. यामध्ये रमेश भोसले हे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत रमेश यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी कृष्णा भोसले याच्यावर खुनाचा प्रयत्न
केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरखंडे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

चंदननगर पोलिसांकडून दुचाकी चोरणार्‍याला अटक, 7 वाहने जप्त

पुणे : इंजिनिअरिंगला प्रवेश देण्याच्या बहाण्याने 19 लाखांची फसवणूक

Nashik Crime News | तीन सराईत आरोपींना उपनगर पोलिसांकडून अटक, दोन पिस्टल तीन काडतुसे जप्त

पुणे : जुन्या भांडणाच्या कारणावरुन दोघांना बेदम मारहण, दोन सराईत गुन्हेगारांवर FIR

फसवणूक प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी यांच्यासह मुलाविरुद्ध आणखी एक गुन्हा