Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : स्वयंघोषीत भाईकडून हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करुन गाडीची तोडफोड, एकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मी कासारवाडीचा भाई आहे, माझ्याकडे पैसे मागतो का असे म्हणत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करुन कारची तोडफोड केली. तसेच हॉटेल मॅनेजरला शिवीगाळ करुन हॉटेल पेटवून देण्याची धमकी दिली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी (Bhosari Police Station) पाच जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.28) रात्री आठच्या सुमारास कासारवाडी येथील वरुण रेस्टॉरंट अँड बार (Varun Restaurant in Kasarwadi) येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत हॉटेल व्यावसायिक अमूत अण्णय्या शेट्टी (वय-36 रा. शास्त्रीनगर, कासारवाडी, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन ऋषीकेश उर्फ मुंगळ्या विश्वनाथ मोटे (वय-20 रा. कासारवाडी) याला अटक केली आहे. तर त्याचे साथीदार अरमान कपिल देशमुख, रोहित कदम, अभी मोरे, शिवा पवार (सर्व रा. कासारवाडी) यांच्यावर आयपीसी 395, 336, 427 सह महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या हॉटेलमधून पाच बिअर मागून नेल्या.
मात्र, बिअरचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपी अरमान याच्या वडिलांना याबाबत सांगितले.
याचा राग आल्याने आरोपींनी हॉटेल मॅनेजर सुरक्षीत देशमुख याला दमदाटी करुन आज रात्री बारा वाजता अमूत याला
मारुन हॉटेल पेटवून देतो अशी धमकी दिली.

दरम्यान, फिर्य़ादी हे हॉटेलच्या मागील मोकळ्या जागेत कार पार्क करत असताना आरोपी दुचाकीवरुन त्याठिकाणी आले.
त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच अरमान याने मी कासारवाडीचा भाई आहे असे म्हणत,
तुला दाखवतो अशी धमकी देऊन फिर्यादी यांच्या खिशातील 2700 रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
तसेच फिर्यादी यांच्या गाडीची तोडफोड करुन नुकसान करुन पोलिसांकडे तक्रार केली तर तुझे हॉटेल चालु देणार नाही
अशी धमकी देत शिवागाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil On PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका का केली?, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सांगितले ‘हे’ कारण

Ajit Pawar | ‘ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार’ शरद पवारांच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया