Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन तरुणावर चाकूने वार, आरोपी गजाआड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | शिवागाळ केल्याच्या रागातून तरुणाच्या घरी जाऊन शिवीगाळ करुन चाकूने तरुणाच्या गळ्यावर वार केले (Stabbing Case). या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी एकाला तळेगाव दाभाडे पोलिसांनी (Talegaon Dabhade Police) अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.29) रात्री साडेबाराच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील थंडा मामला हॉटेलच्या मागील दिलीप शहा यांच्या गोडावुनमध्ये घडला.(Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत वैभव अशोक कदम (वय-25 रा. बोल्हाई मळा, जाधव वाडी, चिखली मुळ रा. पिंपळटक्का ता. वडवणी जि. बीड) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन श्रीधर उत्तम जावळे (वय-39 रा. बालाजी नगर, भोसरी, पुणे) याच्यावर आयपीसी 307, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव कदम याचा मित्र अनिकेत जावळे याला घरी सोडण्यासाठी गेले होते.
फिर्यादी अनिकेतच्या खोलीत थांबले होते.
त्यावेळी अनिकेतने दुपारी आरोपीचा भाऊ अतुल जावळे याला फोन करुन शिवीगाळ केली होती.
याचा राग मनात धरुन आरोपी अनिकेतच्या घरी आला.
त्यावेळी फिर्यादी वैभव याने खोलीचा दार उघडला असता आरोपीने फिर्यादी याच्यावर चाकुने प्राणघातक हल्ला केला.
आरोपीने फिर्यादी यांच्या मानेपासून गळ्यापर्यंत वार करत गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil On PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका का केली?, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सांगितले ‘हे’ कारण

Ajit Pawar | ‘ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार’ शरद पवारांच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया