Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : हॉर्न वाजवल्याच्या कारणावरुन चालकाला लुटले, तिघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी पिकअप वाहनासमोर गाडी उभा केल्याने पिकअप चालकाने हॉर्न वाजवला. हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने दुचाकीवरील तिघांनी पिकअप चालकाला दमदाटी करुन खिशातील मोबाईल आणि 800 रुपये जबदस्तीने चोरुन नेले. हा प्रकार मंगळवारी (दि.23) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास चिखली परिसरातील कृष्णानगर येथील सिमेंट ग्राऊंड जवळ घडला. याप्रकरणी चिखली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पिकअप चालक रंजितसिंग हजारीलाल जांगडा (वय-38 रा. आरगना सोसायटी, कृष्णानगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन रोहन उर्फ इंदर शंकर पंडीत (वय-20 रा. भिमशक्ती नगर, स्पाईन रोड, चिखली), रोहीत रामदास दिलसे (वय-29 रा. मोरे वस्ती, चिखली), आकाश बाळासाहेब पाटोळे (वय-21 रा. मोरेवस्ती, चिखली) यांच्यावर आयपीसी 392, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची पिकअप गाडी (एमएच 14 के.ए. 4202) घेऊन रस्त्याने जात होते.
त्यावेळी आरोपी ट्रिपलसिट दुचाकीवरुन पाठिमागून फिर्यादी यांच्या गाडीसमोर अचानक आले.
त्यामुळे फिर्यादी यांनी गाडीचा हॉर्न वाजवला. याचा राग आल्याने आरोपींनी त्यांची गाडी फिर्यादी यांच्या गाडीसमोर थांबवली. त्यानंतर फिर्यादी यांच्या जवळ येऊन हॉर्न का वाजवतो अशी विचारणा करुन त्यांच्या खिशातील 25 हजार रुपये किंमतीचा मोबाईल, 800 रुपये व गाडीची चावी चोरून घेऊन गेले. याबाबत रंजितसिंग यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | येरवडा परिसरातील अट्टल गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची 97 वी कारवाई

पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल, तरुणावर FIR

Pune News | गुड न्यूज! पुणे, पिंपरी-चिंचवड पाठोपाठ आता तिसरी महापालिका, जिल्ह्यातील ‘या’ गावांचा समावेश