Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : फुटींग होल घेताना जिलेटिनचा स्फोट, कामगाराचा मृत्यू; एकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | फुटींग होलचे काम सुरु असताना ट्रॅक्टरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. त्यानंतर जिलेटिनचा स्फोट होऊन कामगाराचा मृत्यू झाला. तर दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना खेड तालुक्यातील करंजविहीरे गावातील नवीन स्टोन क्रशर प्लान्टवर शनिवारी (दि.27) सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime News)

राजेश कुशावाह असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. रवींद्र अरुण तोत्रे (रा. वडगाव पाटोळे ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर स्वप्निल बाबाजी कोळेकर, निलेश सदाशिव कोळेकर, बाबाजी रामदास कोळेकर (रा. करंजविहीरे ता. खेड) यांच्यावर आयपीसी 304(2), सह विस्फोटक अधिनियम 1884 चे कलम 9(ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक किरण शिवाजी शिंदे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे कॉम्प्रेसर ट्रॅक्टरने फुटींग होल घेण्याचे काम करतात.
त्यांच्याकडे रमेश मोतीलाल कोल (वय-35 रा. जामुन तोला. जि. सतना, मध्यप्रदेश), अलोक कोल, राजेश कुशवाह हे
काम करत होते. आरोपींकडे जिलेटीन देखील बाळगले होते.
त्यांनी कामगारांना कोणतेही प्रशिक्षण न देता त्यांच्याकडून सदोष कॉम्प्रेसरने फुटींग होलचे काम करून घेतले.
फुटींग होलचे काम सुरु असताना शनिवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास ट्रॅक्टरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला.
त्यानंतर जिलेटीनचा देखील स्फोट झाला. यामध्ये कामगार राजेश कुशवाह याचा मृत्यू झाला. तर अलोक कोल आणि रमेश कोल हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Attack On Cop In Pune | पुणे : दुचाकीस्वाराकडून पोलिसाला शिवीगाळ करुन खुर्चीने मारहाण

Congress Vs BJP | पक्ष, नेते फोडण्यापाठोपाठ आता उमेदवार पळविण्याचा भाजपाचा ‘खेळ’, सूरतनंतर एमपीत काँग्रेस उमेदवाराची माघार, कमळ घेतलं हाती