Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : चिखली परिसरातील कुख्यात गुन्हेगार मोन्या लुडेकर तडीपार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील अभिलेखावरील गुन्हेगार (Criminal On Police Record) तपासून त्यांच्यावर मोका (MCOCA Action) व एमपीडीए कायद्यांतर्गत (MPDA Act) कारवाई करण्यात येत आहेत. चिखली पोलीस ठाण्याच्या (Chikhali Police Station) हद्दीतील अट्टल गुन्हेगार आदर्श उर्फ मोन्य लुडेकर याला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस उपाआयुक्त परिमंडळ -3 शिवाजी पवार यांनी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.(Pune Pimpri Chinchwad Crime News)

आदर्श उर्फ मोन्य विठ्ठल लुडेकर (वय-22 रा. पंचवटी हौसिंग सोसायटी, शरदनगर, चिखली, पुणे) असे तडीपार केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीने गुन्हेगारांची टोळी तयार करुन घातक शस्त्र जवळ बाळगून चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत व आसपासच्या परिसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. त्याच्यावर जबरी चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, गंभीर दुखापत असे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या गुंडगिरी व दादागिरीमुळे चिखली परिसरात दहशत निर्माण झाली होती.

आदर्श उर्फ मोन्य विठ्ठल लुडेकर याच्यावर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 शिवाजी पवार यांना सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस उपायुक्तांनी आदर्श लुडेकर याला एम.पी.डी.ए कायद्यान्वये नागपूर येथे दोन वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

ही करावाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त संदीप हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश मासाळ, पोलीस अंमलदार सचिन गायकवाड, महिला पोलीस हवालदार दुर्गा केदार यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murlidhar Mohol | पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यावर भर : मुरलीधर मोहोळ

Amol Kolhe On Gas Cylinder Price | गॅस सिलिंडरच्या तीनवेळा पाया पडा, मग विचार करून मतदान करा, अमोल कोल्हेंचे मतदारांना आवाहन