Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: 12 रुपये पाठवण्यास सांगून ज्येष्ठ नागरिकाला 3 लाखांचा गंडा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | एम.एन.जी.एल. कंपनीतून (MNGL Company) बोलत असल्याचे सांगून अकाउंट अपडेट केल्याचे 12 रुपये डेबीट कार्डने भरण्यास सांगून एका 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) तीन लाखांचा गंडा घातला. हा प्रकार 8 जून रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्यच्या सुमारास पिंपरी येथे घडला आहे. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने बुधवारी (दि.12) पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. (Online Cheating)

पोलिसांनी सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीचा (Cheating Fraud Case) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका अनोळखी मोबाईल नंबरवरुन फोन आला. समोरच्या व्यक्तीने एम.एन.जी.एल. कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तुम्ही गॅस बिलाचे पेमेंट कसे करता असे विचारुन व गॅस बिलाचे पेमेंट करण्यासाठी एम.एन.जी.एल. कंपनीचे अॅपचा वापर करण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना त्यांच्या एटीएमचा कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, बँक अकाउंट नंबर विचारुन व्हॉट्सअ‍ॅपवर एक लिंक पाठवली.(Pune Pimpri Chinchwad Crime News)

लिंकवर क्लिक करुन फॉर्म भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्य़ादी यांनी लिंक ओपन करुन सर्व माहिती भरली.
त्यानंतर सायबर चोरट्यांनी अकाउंट अपडेट झाले असून त्याची अपडेशन फी 12 रुपये डेबिट कार्डने भरण्यास सांगितले.
फिर्यादी यांनी 12 रुपये पेमेंट केले असता समोरच्या व्यक्तीने फिर्यादी यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या बँक खात्यातून 2 लाख 94
हजार 500 रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aundh Pune Crime News | पुणे : पहाटेच्या सुमारास दरोड्याच्या उद्देशाने तिघांना रॉडने बेदम मारहाण, दोघांची प्रकृती चिंताजनक; औंध परिसरातील घटना

PM Kisan Samman Nidhi | तारीख ठरली! पुढील आठवड्यात ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येतील पैसे