Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : धक्कादायक! प्रेमसंबंध तोडल्याने तरुणीला रस्त्यात अडवून केले वार, परिसरात खळबळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | प्रेयसीने संपर्क तोडल्याच्या रागातून तरुणाने तिच्यावर धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच तिला जातीवाचक शिवीगाळ केली. हा प्रकार सोमवारी (दि.27) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास किवळे येथील रुणाल गेटवे सोसायटीच्या (Runal Gateway Kiwale) मागील मोकळ्या रानात घडला आहे. याप्रकरणी रावेत पोलिसांनी (Ravet Police ) एका तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत जखमी झालेल्या 19 वर्षीय तरुणीने मंगळवारी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन आसिफ मोहम्मद शेख (वय-24 रा. मुकाई चौक, किवळे, ता. हवेली) याच्यावर आयपीसी 307, 323 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Attempt To Murder)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात प्रेमसंबंध (Love Affair) होते.
मात्र, मुलीने मागील दीड वर्षापासून आरोपीसोबत असलेले प्रेमसंबंध संपवले होते. याचा राग आरोपीच्या मनात होता.
सोमवारी सायंकाळी तरुणी कामावरून घरी जात असताना रुणाल गटवे सोसायटीच्या मागील मोकळ्या रानातील
रस्त्यावर आरोपीने तिला अडवले. प्रेमसंबंध संपवल्याच्या कारणावरुन तिला जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केली. तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने गळा दाबून धारदार शस्त्राने गळ्यावर व हातावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत जखमी झालेल्या तरुणीने रावेत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल कुंभार (API Rahul Kumbhar) करीत आहेत.(Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dwarka Doke | एव्हरेस्टवर महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा; द्वारका डोके यांनी सर केले एव्हरेस्ट शिखर

Supriya Sule On Devendra Fadnavis | पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित; सुप्रिया सुळेंची टीका