Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला अटक, 2 पिस्टल व काडतुसे जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Crime Branch) दरोडा विरोधी पथकाच्या पोलिसांनी अटक केली आहे. तर एकावर गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्या आरोपीकडून 2 पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई रविवारी (दि.28) रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास आळंदी पोलीस ठाण्याच्या (Alandi Police Station) हद्दीतील मरकळ गावात (Markal) केली.(Pune Pimpri Chinchwad Crime News)

अर्जुन भाऊराव सुर्यवंशी Arjun Bhaurao Suryavanshi (वय-20 रा. कोकण धर्मशाळा, पद्मावती रोड, आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अंकित भस्के (रा. चाकण) याच्यावर भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस शिपाई सुमित दत्तात्रेय देवकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर शस्त्र बागळगणाऱ्यांवर कारवाई गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.
आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलींग करीत होते.
त्यावेळी पोलीस पथकाला मरकळ गावातील माऊली हार्डवेअर शेजारी एक व्यक्ती उभा असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने त्याठिकाणी जाऊन आरोपी अर्जुन सुर्यवंशी याला ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 80 हजार रुपये किमतीचे दोन पिस्टल व दोन हजार रुपये किमंतीचे दोन जिवंत काडतुसे असा एकूण 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास दरोडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी (PSI Bhart Gosavi) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Attack On Cop In Pune | पुणे : दुचाकीस्वाराकडून पोलिसाला शिवीगाळ करुन खुर्चीने मारहाण

Congress Vs BJP | पक्ष, नेते फोडण्यापाठोपाठ आता उमेदवार पळविण्याचा भाजपाचा ‘खेळ’, सूरतनंतर एमपीत काँग्रेस उमेदवाराची माघार, कमळ घेतलं हाती