Pune Pimpri Chinchwad Crime News | अल्पवयीन मुलीला भररस्त्यात केलं प्रपोज, एकाला अटक; खडकी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अल्पवयीन मुलीला भररस्त्यात आडवून तिला प्रोपोज केलं. तिने नकार दिल्याने तिच्या घरात घसून आजीला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना खडकी परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.19) सायंकाळी सहाच्या सुमारास खडकी बाजार येथील गाडी अड्डा येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत खडकी बाजार परिसरात राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सागर नायर (वय-20 रा. महादेववाडी खडकी बाजार, पुणे) याच्यासह दोन 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलांवर आयपीसी 354, 354 (अ)(ड), 324, 452, 504, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन सागर नायर याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपी व सागर नायर हे पीडित मुलीच्या ओळखीचे आहेत. अल्पवयीन मुलाने पीडित मुलीचा वारंवार पाठलगा करुन त्रास दिला. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पीडित मुलगी खडकी बाजार येथील गाडी अड्डा येथून जात असताना आरोपींनी तिला आडवले. अल्पवयीन मुलाने तिला भररस्त्यात प्रपोज केले. मात्र, मुलीने त्याला नकार दिला. याच रागातून आरोपींनी पीडित मुलीच्या घरात घुसून तिला शिवागाळ केली. तर मुलीच्या आजीला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करुन जखमी केले. या घटनेनंतर मुलीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रिकीबे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

शेअरमार्केटमधील आयपीओ अलॉट झाल्याचे भासवून सव्वातीन कोटींना घातला गंडा