Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : मंडळ अधिकाऱ्यांकडे केलेला हरकत अर्ज मागे घेण्यासाठी खंडणीची मागणी, दोघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | खरेदी केलेल्या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर नाव नोंदणी करण्यास हरकत घेतलेला अर्ज मागे घेण्यासाठी खंडणी (Extortion Case) मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोघांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार थेऊर येथील मंडल अधिकारी कार्यालयासमोर जुलै 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत समिर संभाजी जगताप (वय-31 रा. ढाकाळे, बारामती) यांनी सोमवारी (दि.8) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन कैलास परशुराम कडु (रा. जयभवानी नगर, पौड रोड), सचिन कैलास कडु (रा. शिवणे) यांच्यावर आयपीसी 384, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समिर जगताप व त्यांच्या भागीदारांनी दिलीप कडु व इतरांकडून 106 गुंठे
जमिन नोंदणीकृत खरेदीखत करुन खरेदी केली आहे. या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर नाव नोंदणी करुन देण्यासाठी
दिलीप कडु यांचे नातेवाईक आरोपी कैलास कडु व सचिन कडु यांनी फिर्यादी यांच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली.
फिर्यादी यांनी जमिन खरेदी करताना ठरलेल्या रकमेव्यतीरिक्त 18 लाख रुपये आरोपींना खंडणी स्वरुपात दिले.

यानंतर आरोपींनी वेळोवेळी पैशांची मागणी करुन दीड कोटी रुपये फिर्यादी यांच्याकडून घेतले.
तसेच 7/12 उताऱ्यावर फिर्यादी व त्यांच्या भागीदार यांची नावे नोंदवण्यास आरोपींनी मंडल अधिकारी यांच्याकडे अर्ज
करुन हरकत घेतली. हरकत घेतला अर्ज मागे घेण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे 30 लाख रुपयांची पुन्हा खंडणी
मागितली. पैसे दिले नाही तर 7/12 उताऱ्यावर नावाची नोंद होऊ देणार नसल्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोडके करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Radha Krishna Vikhe Patil | तलाठी भरती : मंत्री राधाकृष्ण विखे यांचा विरोधकांना थेट इशारा, सरकारची बदनामी केली तर गुन्हे दाखल करू!

Comedian Navin Prabhakar | कॉमेडियन नवीन प्रभाकर याचा 14 जानेवारीला खास शो रंगणार

Congress Mohan Joshi On Pune Metro | मेट्रो मार्ग तातडीने पूर्ण करा ! संयमाचा अंत पाहू नका, विमानतळापर्यंत मेट्रो सेवा करा – माजी आमदार मोहन जोशी