Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : ‘धर याला, चाव, छू…’ पिटबुल कुत्रा अंगावर सोडला, मालकावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पिटबुल कुत्रा एका व्यक्तीला दोन ठिकाणी चावला. या प्रकरणी पिटबुल कुत्रा पाळणाऱ्या व्यक्तीवर पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि.21) महात्मा फुले वसाहत, लक्ष्मीनगर परिसरात घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

गणेश मेरुकर (रा. महात्मा फुले वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती) याच्यावर आयपीसी 325, 289, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रोहित मल्लप्पा शिंगे (वय-30 रा. लक्ष्मीनगर, पर्वती) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकाच परिसरात राहात असून आरोपी यांनी पिटबुल जाताची कुत्रा पाळला आहे.
रविवारी रात्री दहाच्या सुमारास आरोपी गणेश मेरुकर याने कुत्र्याला साखळी न लावता त्याला फिरण्यासाठी मोकळे सोडले होते.
त्यामुळे फिर्यादी रोहित शिंगे यांनी कुत्र्याला साखळी लाव तो कोणाला तरी चावेल असे सांगितले.
याचा राग आल्याने गणेश याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन त्यांचा हात पिरगाळला.
आरोपीने त्याच्या पिटबुल जातीच्या कुत्र्याला ‘धर याला, चाव, छू…’ असे सांगितले.
त्यानंतर कुत्र्या फिर्यादी यांच्या अंगावर धावून गेला. त्याने फिर्य़ादी यांच्या उजव्या मांडीला दोन वेळेस चावला.
यामध्ये रोहित जखमी झाला असून त्याच्या मनगटाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकाळजे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

भररस्त्यात अडवून तरुणीला मारहाण करुन विनयभंग, खराडी परिसरातील प्रकार

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात जल्लोषात श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा (Videos)

Pune ACB Trap News | पुणे: 5 लाखाच्या लाच प्रकरणात वकिल झाला मध्यस्थ; लाच घेताना वकिलासह पोलिस उपनिरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

पिंपरी : गांजा विक्री करणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेकडून अटक, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त