Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : रेल्वे, पुणे मनपामध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणूक, दाम्पत्यावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | सरकारी नोकरी (Govt Job) तरुणांचे आकर्षण असते. या नोकरीसाठी अनेक जण प्रयत्न करतात. मात्र, काहीजण याचा फायदा घेऊन युवकांची आणि त्यांच्या पालकांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) करतात. असाच प्रकार पुण्यात घडला आहे. मुलांना रेल्वे, पुणे मनपा (Pune Municipal Corporation (PMC) तसेच सरकारी बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून साडे आठ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत जहाँगिर सत्तार शेख (वय-50 रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) गुरुवारी (दि.11) फिर्याद दिली आहे. यावरून कामराज के. घोडके आणि त्याची पत्नी उज्वला कामराज घोडके (रा. राजु मित्र मंडळाजवळ, सेनापती बापट रोड, पुणे) यांच्यावर आयपीसी 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2020 पासून आजपर्यंत सेनापती रोडवरील चंद्रलोक सोसायटीच्या समोर आणि वडारवाडी येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्य़ादी यांच्या दोन मुलांना व भावाच्या दोन मुलांना सरकारी नोकरी
लावण्याचे आमिष दाखवले. कामराज घोडके याने चौघांना पुणे मनपा, रेल्वेमध्ये टी.सी., सरकारी बँकेत नोकरी लावतो
असे सांगून पैशांची मागणी केली. त्यानुसार फिर्य़ादी यांनी चेक द्वारे सहा लाख रुपये कामराज याला दिले.
आरोपीने फिर्यादी यांनी दिलेला चेक त्याची पत्नी उज्वला हीच्या एफ.सी. रोडवरील बँक खात्यात जमा करुन पैसे घेतले.
यानंतर पुन्हा पैशांची मागणी करुन अडीच लाख रुपये रोख स्वरुपात घेतले. पैसे दिल्यानंतर मुलांना नोकरी लावली नाही.
त्यामुळे फिर्य़ादी यांनी 8 लाख 50 हजार रुपये परत मागितले. मात्र त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली.
आरोपींनी चार मुलांना नोकरी न लावता आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi In Maharashtra | PM मोदींचा आज झंझावाती महाराष्ट्र दौरा, नाशिकमध्ये रोड शो, नवी मुंबईत अनेक कामांचे उद्घाटन

येरवडा कारागृहातील सराईत गुन्हेगाराचा भररस्त्यात वाढदिवस साजरा, पाच जण ताब्यात; जनवाडी परिसरातील घटना

दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, बापावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा; हडपसर परिसरातील घटना

लाच घेताना तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक अ‍ॅन्टी करप्शच्या जाळ्यात

माण- हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाला शिवाजीनगर न्यायालयाची जागा मिळाली