Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : आरबीआय, सेबी मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 41 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | रिझर्व बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) किंवा सेबी मध्ये कायमस्वरुपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 40 लाख 82 हजार 551 रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केली. याप्रकरणी नवी दिल्ली येथील व्यक्तीवर पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत डीएसके विश्व रोड, धायरी येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत राजेश नारायणराव ढमढेरे (वय-55 रा. स्काय आय स्टार सिटी, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून गौरव दिग्विजयनाथ पांडे (रा. न्यु फ्रेन्डस कॉलनी, नवी दिल्ली) याच्यावर आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौरव पांडे याने फिर्यादी राजेश यांना इनकम टॅक्स येथे कमीशनर पदावर असल्याचे खोटे सांगून विश्वास संपादन केला. पांडे याने फिर्यादी यांच्या मोठ्या मुलीला दिल्ली येथील रिझर्व बँक ऑफ इंडिया किंवा सेबी मध्ये कायमस्वरुपी नोकरी लावतो असे आश्वासन दिले. नोकरी लावण्यासाठी त्याने फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी 40 लाख 82 हजार 551 रुपये घेतले.

आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीच्या नावाने खोटे नियुक्तीपत्र तयार करुन दिले. त्यामुळे फिर्यादी यांच्या मुलीने ती करत असलेली नोकरी सोडली. मात्र, नियुक्तीपत्र खोटे असल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपीकडे पैशांची मागणी केली. परंतु त्याने राजेश ढमढेरे यांची दिशाभूल करुन आजपर्यंत मुलीला नोकरी लावली नाही. तसेच घेतलेले पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली. राजेश ढमढेरे यांनी याबाबत सिंहगड रोड पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी करुन आरोपी गौरव पांडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : सावत्र मुलीवर बलात्कार केल्याप्रकारणी वडिलांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

मित्राला दगडाने मारहाण, दोघांवर FIR; स्वारगेट परिसरातील घटना

गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार, तरुणाला अटक; हडपसर परिसरातील प्रकार

President’s Medal | उल्लेखनीय सेवेबद्दल कारागृह सेवेतील 9 जणांना राष्ट्रपती पदक जाहीर

आयएसआयएस दहशतवादी संघटनेला फायनान्स करणार्‍यास एटीएसकडून अटक; उच्च शिक्षित अभियंता हुजेफ शेखचा अनेक देशात प्रवास

Pune Balewadi Crime | WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या बालेवाडी येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 11 मुलींची सुटका (Video)

Pune Police Inspector Transfers | पुणे पोलीस आयुक्तालयातील 17 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Shivsena UBT Group | अजित पवारांनीही मोदीमुक्त रामाचे भजन खासगीत सुरू केले का? शिवसेनेचा सवाल

Rupali Chakankar | अजितदादांवर कारवाई सुरू असताना ‘काळजीवाहू ताई’ रस्त्यावर का उतरल्या नाहीत? रुपाली चाकणकरांचा सवाल