Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : पुन्हा रिलेशनशिप मध्ये राहण्यास नकार दिल्याने तरुणीला दगडाने मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रियकराचे लग्न झाल्याने तरुणीने त्याच्यासोबत असलेले संबंध तोडले. प्रियकराने तरुणीकडे पुन्हा रिलेशनमध्ये राहण्याची मागणी केली. मात्र, तरुणीने त्याला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या प्रियकराने तिला मारहाण करुन डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.15) सायंकाळी सातच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावरील शेल पेट्रोल पंपाजवळ घडला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत हडपसर येथे राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन इम्रान हमीद शेख (रा. कोंढवा, पुणे) याच्यावर आयपीसी 324, 354, 354अ, 323, 504, 506(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये मागील दहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, आरोपीचे 15 दिवसांपूर्वी लग्न झाल्याने फिर्यादी यांनी त्याच्यासोबत असलेले रिलेशन संपवले होते तसेच त्याच्यासोबत संपर्क ठेवला नाही. इम्रान याने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तरुणीला तिच्या मोबाईलवर मेसेज करत होता. मात्र, तरुणीने त्याकडे दुर्लक्ष केले.

इम्रान याने सोमवारी फिर्यादी यांची भेट घेऊन जबरदस्तीने दुचाकीवर बसवले. माझ्यासोबत बोल, परत रिलेशन ठेव अशी मागणी केली. मात्र, तरुणीने याला नकार दिला. यामुळे चिडलेल्या इम्रान याने दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवून तरुणीला कानशिलात लगावल्या. तसेच तुला मारुन टाकतो अशी धमकी देऊन लाथाबुक्क्यांन मारहाण केली. तरुणी खाली पडली असता इम्रान याने त्याठिकाणी पडलेला दगड उचलून तरुणीच्या डोक्यात मारला. यामध्ये तरुणी गंभीर जखमी करुन आरोपी पळून गेला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तरटे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

भररस्त्यात अल्पवयीन मुलीकडे पाहून अश्लील हावभाव, आरोपीला अटक; हिंगणे येथील प्रकार