Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : मॅट्रिमोनी साइटवरील ओळख तरुणीला पडली महागात, लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मॅट्रिमोनियल साईटवरुण तरूणाशी झालेली ओळख एका तरुणीला भलतीच महागात पडली. या तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी तिच्याशी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. त्यानंतर लग्नास नकार दिला. हा प्रकार 2020 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत वडगाव शेरी परिसरात घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत दिघी येथे राहणाऱ्या 34 वर्षीय तरुणीने रविवारी (दि.4) चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन प्रदीप तुकाराम जाधव (वय-40 रा. दत्तनगर, पुसखेड, ता. वाळवा जि. सांगली) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 417, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीने शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर विवाहाकरिता नाव नोंदणी केली होती.
तिथे तिची ओळख आरोपी प्रदीप जाधव याच्यासोबत झाली.
आरोपी प्रदीप जाधव हा भारतीय लष्करात नायब सुभेदार पदावर कार्यरत आहे.
प्रदीप याने पीडित महिलेला आपला घटस्फोट झाला असल्याचे खोटे सांगितले.
तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर लग्नास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात जाऊन
आरोपी प्रदीप जाधव याच्या विरोधात तक्रार दिली. दिघी पोलिसांनी हा गुन्हा चंदनगर पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police PSI Suspended | पुणे विद्यापीठातील ललित केंद्रामध्ये झालेल्या गोंधळानंतर पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन

Nagpur Crime News | पंतप्रधानांच्या बॅनरचे विद्रुपीकरण युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला अटक; काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी केला निषेध, काँग्रेसकडून कुणाल राऊत यांना घरचा आहेर

पुण्यात नात्याला काळीमा! अल्पवयीन पुतणीवर बलात्कार, गर्भपात केल्याप्रकरणी चुलत्याला अटक