Nagpur Crime News | पंतप्रधानांच्या बॅनरचे विद्रुपीकरण युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला अटक; काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी केला निषेध, काँग्रेसकडून कुणाल राऊत यांना घरचा आहेर

ADV

नागपूर : Nagpur Crime News | जिल्हा परिषदेच्या कार्यालयाच्या परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या बॅनरचे विद्रुपीकरण केल्या प्रकरणात प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत (Congress Kunal Raut) यांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्याच पदाधिकार्‍यांनी राऊत यांच्या या कृतीचा निषेध केला आहे. (Nagpur Crime News)

विकसित भारत संकल्पना यात्रेच्या प्रचार -प्रसारासाठी जिल्हा परिषदे कार्यालयाच्या परिसरात दोन बॅनर लावले होते. बॅनरवर वरच्या बाजूला मोदी सरकारची हमी आणि खालच्या बाजूला आपला संकलप विकसित भारत असे नमूद करण्यात आले होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोदेखील होता. शनिवारी सुटीचा दिवस असतानाही दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कुणाल राऊत व ३० ते ४० जण शासकीय इमारतीमध्ये शिरले. त्यांनी दोन्ही बॅनरचे विद्रुपीकरण केले. मोदी या शब्दावर भारत असे स्टीकर चिकवले व काळ्या रंगाने पंतप्रधानांच्या फोटोची विटंबना केली. याप्रकारानंतर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव यांनी सदर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला.

ADV

आधी बजावली नोटीस, नंतर कुहीतून अटक
पोलिसांनी रविवारी सकाळी राऊत यांना पत्र देऊन चौकशीसाठी सोमवारी दुपारी १२ वाजता पोलीस ठाण्यात
उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजावली होती. तसा दावा एनएसयुआयच्या पदाधिकार्‍यांनी केला. त्यानंतर सायंकाळी राऊत यांना कुही येथून अटक करुन रात्री उशिरा नागपूरला आणण्यात आले.

काँग्रेसकडून निषेध
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुंदा राऊत यांनी या विद्रुपीकरणाचा निषेध करत कुणाल राऊत यांना घरचा आहेर दिला आहे.
पंतप्रधान हे कुठल्याही पक्षाचे नाही तर ते देशाचे आहेत. ते एका संविधानिक पदावर बसलेले आहेत.
त्यामुळे असे कृत्य करणार्‍या लोकांचे नागपूर जिल्हा परिषद व काँग्रेसदेखील समर्थन करत नाही.
या घटनेची माहिती आम्हाला मिळताच आम्ही प्रशासनाला फोन करुन असे कृत्य कोणी केले याची चौकशी करुन
उचित कारवाई करावी, अशी भूमिका मांडल्याचे कुंदा राऊत यांनी स्पष्ट केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले

पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्‍हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक