Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : मोठा फायदा करुन देण्याच्या बहाण्याने एक कोटींची फसवणूक, दोघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | जागा विकसीत करण्यासाठी गुंतवणूक (Investment) केल्यास करोडो रुपयांचा फायदा करुन देतो असे आमिष दाखवून एक कोटी 11 लाखांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2008 ते आज पर्यंत जंगली महाराज रोडवरील एका हॉटेलमध्ये घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत प्रताप बाळासाहेब ढमाले (वय-48 रा. भेलकेनगर समोर, कोथरुड) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) गुरुवारी (दि.11) फिर्याद दिली आहे. यावरुन अण्णा तुकाराम लष्करे (वय-57), अनिल सर्जेराव पवळ (वय-47 रा. बराटे बिल्डींग, तपोधाम सोसायटी, वारजे, पुणे) यांच्यावर आयपीसी 420, 406, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लष्करे आणि पवळ यांनी फिर्यादी यांना अहमदनगर येथील एक जागा
विकसीत करण्यासाठी गुंतवणूक केल्यास अनेक पटीने करोडो रुपयांचा फायदा करुन देतो असे आमिष दाखवले.
फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून त्यांना वेळोवेळी चेक व रोख असे एकूण 1 कोटी 11 लाख 45 हजार रुपये दिले.
मात्र, आरोपींनी जागा विकसीत न केल्याने फिर्यादी यांनी पैसे मागितले. त्यावेळी अनील पवळ याने दोन चेक फिर्यादी यांना दिले. फिर्यादी प्रताप ढमाले यांनी चेक बँकेत वटवण्यासाठी गेले असता आरोपींनी बँकेतुन पेमेंट स्टॉप केल्याची माहिती बँक कर्मचाऱ्यांनी ढमाले यांना दिली. याबाबत विचारणा केली असता आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली. आर्थिक फसवणूक झाल्याने प्रताप ढमाले यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बढे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi In Maharashtra | PM मोदींचा आज झंझावाती महाराष्ट्र दौरा, नाशिकमध्ये रोड शो, नवी मुंबईत अनेक कामांचे उद्घाटन

येरवडा कारागृहातील सराईत गुन्हेगाराचा भररस्त्यात वाढदिवस साजरा, पाच जण ताब्यात; जनवाडी परिसरातील घटना

दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, बापावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा; हडपसर परिसरातील घटना

लाच घेताना तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक अ‍ॅन्टी करप्शच्या जाळ्यात

माण- हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाला शिवाजीनगर न्यायालयाची जागा मिळाली