Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : मामाकडून 9 वर्षीय भाच्यावर लैंगिक अत्याचार, समुपदेशनातून प्रकार उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | आई वडिल विभक्त राहत असल्याने 9 वर्षाचा अल्पवयीन मुलगा आपल्या आईसोबत मुंबईत मामाजवळ राहतो. मुलाच्या मामाने त्याच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन त्याच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी मुलाचे समुपदेशन केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समजला. याप्रकरणी मुंबईत राहणाऱ्या मुलाच्या मामावर पुण्यातील उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत शिवणे परिसरात राहणाऱ्या 39 वर्षीय व्यक्तीने बुधवारी (दि.31 जानेवारी) उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन मुलाचा मामा कृष्णा सुरेश भगत (वय-35 रा. टिळक नगर, चेंबुर, मुंबई) याच्यावर आयपीसी 354(एन) सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जुन 2018 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या पत्नीमध्ये कौटुंबिक वाद आहेत. त्यामुळे ते दोघे विभक्त राहतात.
फिर्यादी यांचा न्यायालयात वाद चालू आहे.
न्यायालयाने फिर्यादी यांच्या 9 वर्षाच्या मुलाचा ताबा त्यांच्या पत्नीकडे देण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे मुलगा पत्नीकडे राहत. न्यायालयाच्या आदेशाबाबत फिर्यादी यांनी सुप्रीम कोर्टात अपील केली आहे.
फिर्यादी यांची पत्नी व मुलगा मेहुणा कृष्णा भगत याच्याकडे मुंबईत राहत आहेत.

दरम्यान, फिर्यादी हे पोलिसांसह आरोपीच्या घरी मुलाला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी मुलगा घाबरल्याचे दिसून आला.
मुलाचे समुपदेशन केले असता त्याने सांगितले की, ‘मामा माझ्या बमला चिमटे काढतो व काहीतरी टोचवतो’.
आरोपीने मुलाच्या बमला चिमटे काढून त्याच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन त्याच्यावर लैंगिक
अत्याचार केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमृता चवरे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा
Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळ खून प्रकरण : कुख्यात गुंड गणेश मारणेला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संगमनेर येथून ओला-उबेर गाडीतून जात असताना घेतलं ताब्यात

Maharashtra Police Officer Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील विशेष पोलीस महानिरीक्षक, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

स्वारगेट एसटी स्टॅन्डच्या परिसरातून प्रवाशांचे दागिने चोरणार्‍या महिलेला स्वारगेट पोलिसांकडून अटक