Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर चुलत्याकडून लैंगिक अत्याचार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यातील गंजपेठेतील एच.पी लोहीयानगर येथे काका आणि पुतणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. चुलत्याने आपल्याच 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. यातून पीडित मुलगी गरोदर राहिली. हा प्रकार 1 नोव्हेंबर ते 24 जानेवारी या कालावधीत एच.पी. लोहीयानगर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत एच.पी. लोहीयानगर येथे राहणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने बुधवारी (दि. 31 जानवारी) खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून सुलतान अब्बास मकानदार (वय-19 रा. रत्नागिरी) याच्यावर आयपीसी 363, 376/2/एन/एफ/जे, 376(3), 323, 504 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित मुलीचा चुलत चुलता आहे.
1 नोव्हेंबर रोजी पीडित मुलीची आई कामावर गेली असता आरोपीने मुलीला माझ्या सोबत चल असे म्हणत जबरदस्तीने कुडाळ येथे घेऊन गेला.
पीडित मुलगी आरोपीसोबत कुडाळ येथे दोन महिने राहिली.
याच दरम्यान आरोपीने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून पीडित मुलगी गरोदर राहिली.
यानंतर आरोपीने मुलीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.
याबाबत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर हा गुन्हा खडक पोलीस पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक तोटेवार करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा
Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळ खून प्रकरण : कुख्यात गुंड गणेश मारणेला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संगमनेर येथून ओला-उबेर गाडीतून जात असताना घेतलं ताब्यात

Maharashtra Police Officer Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील विशेष पोलीस महानिरीक्षक, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

स्वारगेट एसटी स्टॅन्डच्या परिसरातून प्रवाशांचे दागिने चोरणार्‍या महिलेला स्वारगेट पोलिसांकडून अटक