Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कापड दुकानात काम करणाऱ्या एकाने अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ काढून विनयभंग (Molestation Case) केला. तसेच मुलीचा पाठलाग करुन तिचा मानसिक छळ केल्याप्रकरणी एकावर खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार खडकी बाजार येथील एका कापड दुकानात बुधवारी (दि.17) दुपारी दोनच्या सुमारास घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

ADV

याबाबत पीडित 16 वर्षीय मुलीने शुक्रवारी (दि.19) खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन दुकानात काम करणारा विशाल कोळी (रा. दापोडी, पुणे) याच्यावर आयपीसी 354ड सह आयटी अॅक्ट व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी खडकी बाजार येथील एका कापड दुकानात काम करतात. अल्पयीन मुलीच्या छातीचे हाड वाढले असल्यामुळे आरोपीने मावशीला दाखवण्यासाठी छातीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढला. त्यानंतर हा व्हिडिओ मुलीला दाखवून तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यानंतर विशाल याने व्हिडिओ डिलीट करतो असे सांगितले. मात्र, व्हिडिओ डिलीट केला नाही. तसेच तिचा पाठलाग करुन मुलीचा मानसिक छळ केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार, लग्नास नकार देणाऱ्या तरुणावर FIR