Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : मास्क लावून फिरत असल्याच्या कारणावरुन तरुणाला दगडाने मारहाण, चार जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | तोंडाला मास्क लावून फिरत असल्याच्या कारणावरुन दोन जणांना शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला चार जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.30) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती गावच्या हद्दीतील इंदिरानगर येथे घडली आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ( Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबबत अविनाश महादेव कामठे (वय-22 रा. खैरेवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली) याने बुधवारी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सद्दाम अंन्सारी, आतिष झेंडे, समीर शेख व सुरज म्हात्रे (सर्व रा. इंदिरानगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी सद्दाम अंन्सारी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
फिर्यादी व त्यांचा मित्र आदित्य काळाने हे दोघे दुचाकीवरुन कामानिमित्त लोणी काळभोर येथे जात होते.
त्यावेळी आरोपी अन्सारी याने तुम्ही दोघे मास्क लावून का फिरता असे म्हणत शिवीगाळ करुन निघून गेला.
काही वेळाने अविनाश कामठे हा इंदिरानगर येथे गेला. त्याने आरोपीला तू शिवागाळ का केली असे विचारले.
याचा राग आल्याने आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी माराहण करण्यास सुरुवात केली.
तसेच त्या ठिकाणी पडलेला दगड उचलून अविनाश याच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.
याबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे मारुन टाकीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा
Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळ खून प्रकरण : कुख्यात गुंड गणेश मारणेला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संगमनेर येथून ओला-उबेर गाडीतून जात असताना घेतलं ताब्यात

Maharashtra Police Officer Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील विशेष पोलीस महानिरीक्षक, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

स्वारगेट एसटी स्टॅन्डच्या परिसरातून प्रवाशांचे दागिने चोरणार्‍या महिलेला स्वारगेट पोलिसांकडून अटक