Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, येरवडा परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तरुणीसोबत वारंवार शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. यातून तरुणी गरोदर राहिल्यानंतर तिचा जबरदस्तीने गर्भपात करुन लग्न करण्यास नकार दिला. हा प्रकार मे 2022 ते जानेवारी 2024 या कालावधीत ठाणे आणि कल्याणीनगर येथील एका हॉटेलमध्ये घडला आहे. याप्रकरणी एका तरुणावर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत येरवडा येथे राहणाऱ्या 30 वर्षीय तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन निखील रघुनाथ भानुसे (वय-30 रा. ससाणे नगर, हडपसर) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 417, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची इव्हेंट प्लॅनिंगची कंपनी होती. मात्र, कंपनी चालत नसल्याने आरोपी निखिल भानुसे याच्या ऑफिसमध्ये सेल्स मॅनेजर या पदाच्या मुलाखतीसाठी गेली होती. त्यावेळी त्यांची ओळख झाली.

आरोपी निखिल याने पीडित तरुणीसोबत मैत्री केली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्याने तरुणीला लग्नाची मागणी घातली. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला होकार दिला. त्यानंतर आरोपीने कल्याणी नगर येथील हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावून घेत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, निखील याला ठाण्यात एका बँकेत नोकरी लागल्याने तो ठाण्याला गेला. त्यानंतर तो पुण्यात येऊन फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होता. दरम्यान, पीडित मुलगी गरोदर राहिल्याने तिने लग्नाबाबत विचारणा केली.

निखील भानुसे याने पीडित तरुणीला ठाण्यात बोलावून घेत तिचा जबरदस्तीने गर्भपात केला.
याबाबत मुलीने निखिलच्या वडिलांना सांगितले असता निखिलच्या लग्नासाठी मुली पाहात असल्याचे सांगितले.
तरुणीने निखिल कडे लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने लग्न ठरल्याचे सांगून फिर्यादी यांना शिवीगाळ करुन
लग्न करण्यास नकार दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तरुणीने दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करुन
येरवडा पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

संपूर्ण राज्यात हुडहुडी; पुण्यात हंगामातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद

हडपसर परिसरात दोन टोळक्यामध्ये राडा, सराईत गुन्हेगारासह 6 जणांना अटक

पुणे : बदनामी करण्याची धमकी देऊन शारीरिक संबंधाची मागणी, मित्रावर गुन्हा दाखल

कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण, एकाला अटक; लष्कर परिसरातील घटना

चुलत्याकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना

मौजमजेसाठी रिक्षा चोरणारा भारती विद्यापीठ पोलिसांकडून गजाआड, दोन रिक्षा जप्त

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, लग्नास नकार देणाऱ्या तरुणाला समर्थ पोलिसांकडून अटक