Pune Pimpri Chinchwad Crime News | हडपसर परिसरात दोन टोळक्यामध्ये राडा, सराईत गुन्हेगारासह 6 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | हडपसरमधील गोसावी वस्ती येथे दोन टोळक्यांमध्ये तुफान राडा झाला. दगडफेक करुन हत्याराने गाडीची तोडफोड करत दहशत पसरवली. याप्रकरणी 25 ते 26 जणांवर हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) गुन्हा दाखल करुन एका सराईत गुन्हेगारासह सहा जणांना अटक केली आहे. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा प्रकार सोमवारी (दि.22) रात्री साडे दहाच्या सुमारास गोसावी वस्ती मधील सुरक्षानगर रोडवर घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत राम राजू लाकडे (वय-20 रा. वैदवाडी, हडपसर) याने दिलेल्या फिर्यादीवरुन सराईत गुन्हेगार रोहन गायकवाड याच्यासह रोहित गायकवाड, अमित दुधाने, रोहन दोडके, राहुल गायकवाड, शुभम खिलारे व इतर दोघांवर आयपीसी 324, 341, 427, 143, 147, 149, 504, 506(2) सह महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन रोहन, रोहीत, राहुल गायकवाड यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम लाकडे हा त्याच्या मित्रासह परिसरात लाडू वाटत होता. त्यावेळी रोहन गायकवाड व त्याच्या साथीदारांनी फिर्य़ादी याच्या गाडीला त्यांची दुचाकी आडवी घातली. आरोपींनी फिर्यादी यांना हा आमचा एरिया आहे असे बोलून शिवीगाळ केली. तसेच डोक्यात दगड मारुन जखमी केले. आरोपींनी फिर्यादी याच्या दुचाकीवर हत्यार मारुन तोडफोड केली. तसेच हातातील हत्यारे हवेत फिरवून मध्ये कोण आले तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन दहशत पसरवली. आरोपींनी फिर्यादी व त्याच्या साथीदारांवर दगडफेक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बर्गे करीत आहेत.

तर रोहन भारत गायकवाड (वय-21 रा. गोसावी वस्ती, हडपसर) याने दिलेल्या तक्रारीवरुन विशाल शिंदे, रोहित शिंदे,
ओमकार शिंदे, प्रकाश लाकडे, प्रभाकर पवार, मारुती पवार, राहुल लोखंडे, सारंग लोखंडे, अक्षय पवार, अजय पवार, आकाश ठाकूर, शुभम पवार, तुषार रेड्डी, आदित्य शिंदे, छोटू शिंदे, राम लाकडे, अशोक लाकडे, राजू शिंदे, अशोक शिंदे (सर्व रा. वैदुवाडी, हडपसर) यांच्यावर आयपीसी 324, 323, 143, 145, 147, 149, 504, 506 सह अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन रोहीत शिंदे, मारुती पवार आणि राम लाकडे यांना अटक केली आहे.

रोहन गायकवाड याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रोहन आणि त्याचे भाऊ वस्तीमधील मित्रांसोबत गप्पा मारत थांबले होते.
त्यावेळी राम लाकडे व त्याचे साथीदार त्याठिकाणी आले. त्यांनी फटाके वाजवण्यास सुरुवात केली.
त्यावेळी रोहन याने याठिकाणी फटके वाजवू नका असे सांगितले. यावरुन आरोपींनी रोहन याला जातीवाचक शिवीगाळ
करुन जीवे मारण्याची धमकी देऊन धक्काबुक्की केली. तसेच रोहनचे आई-वडिल व बहिण भांडण सोडवण्यासाठी आले
असता त्यांना दगडाने मारहाण केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
पुढील तपास हडपसर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त अश्वीनी राख करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : बदनामी करण्याची धमकी देऊन शारीरिक संबंधाची मागणी, मित्रावर गुन्हा दाखल

कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण, एकाला अटक; लष्कर परिसरातील घटना

चुलत्याकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना

मौजमजेसाठी रिक्षा चोरणारा भारती विद्यापीठ पोलिसांकडून गजाआड, दोन रिक्षा जप्त

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, लग्नास नकार देणाऱ्या तरुणाला समर्थ पोलिसांकडून अटक

Pavitra Portal | स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती, पवित्र पोर्टलवरील जाहिरात प्रक्रिया मुदतीत पूर्ण करा

बहिणीबाबत विचारणा केल्याने नातेवाईक तरुणांना मारहाण, महाळुंगे परिसरातील प्रकार

Pune News | फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (FTII) ‘बाबरी’ वरुन राडा, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक (Video)