Pune Pimpri Chinchwad Crime News | साडेचार वर्षाच्या चिमुकलीचे लैंगिक शोषण, नाराधम बापाला अटक; खराडी परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | जन्मदात्या बापानेच साडेचार वर्षाच्या मुलीशी गैरवर्तनुक करुन तीचे लैंगिक शोषण (Sexual Abuse) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी नारधम बापावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही धक्कादायक घटना खराडी परिसरात 6 जानेवारी पूर्वी आठ ते दहा आधी घडली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पीडित मुलीच्या 34 वर्षीय आईने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरून आरोपी बापावर आयपीसी 376, 354 क सह पोक्सो कलम 4, 5(एन), 5(ग), 6, 8, 12 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी पती पत्नी असून त्यांना साडेचार वर्षाची मुलगी आहे.
आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना तिच्यासोबत गैरवर्तन करुन तिच्या स्त्री मनास भिती व
लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. आरोपीने मुलीचे लैंगिक शोषण केले.
पीडित मुलीने तिच्या आईला याबाबत सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे.
पीडित मुलीच्या आईला हा प्रकार समजल्यानंतर तिने चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरोधात फिर्य़ाद दिली.
पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुळुक करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पोलीस असल्याचे सांगून तपासणी करण्याच्या बहाण्याने जेष्ठ नागरिकाला लुटले, चाकण एसटी स्टँड समोरील घटना

पत्नी अन् सासरच्या लोकांनी तरुणाला पाजले विष, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; बालेवाडी येथील घटना

Aaditya Thackeray | आमदार पात्रता निकालावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, ”देशासाठी हे मोठे संकेत आहेत…”