Pune Pimpri Chinchwad Crime News | अ‍ॅम्बुलन्स मधून गांजाची तस्करी ! 7 जणांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून अटक; 1 कोटी 31 लाखांचा गांजा जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Squad) तब्बल एक कोटी 31 लाख रुपयांचा 96 किलो 087 ग्रॅम गांजा जप्त (Ganja Seized) केला आहे. पिंपरी चिंचवड परिसरात विक्रीसाठी आणल्यानंतर पोलिसांनी गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी सात जणांना अटक केली आहे. आरोपी गांजाची तस्करी करण्यासाठी चक्क अॅम्ब्युलन्सचा वापर करत होते. पोलिसांनी दोन अॅम्ब्युलन्स जप्त केल्या आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

अंमली विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार सदानंद रुद्राक्षे व रणधीर माने यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने 12 जानेवारी रोजी रावेत पोलीस ठाण्याच्या (Rawet Police Station) हद्दीतील मस्के वस्ती येथून तिघांना अटक केली. आरोपी कृष्णा मारुती शिंदे (वय-27 रा. शिंदे वस्ती, शिरतपुर, ता. कर्जत. जि. नगर), अक्षय बारकु मोरे (वय-29 रा. कान्होबा वस्ती, पाटेगाव, ता. कर्जत), हनुमंत भाऊसाहेब कदम (वय-35 रा. कुसडगाव, ता. जामखेड) यांच्याकडून 30 लाख 55 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यामध्ये 25 लाख 69 हजार 100 रुपये किंमतीचा 25 किलो 691 ग्रॅम गांजा आणि एक शेवरोलेट क्रुझ कार (एमएच 14 सी.डब्ल्यु 0007), चार मोबाईल व 1600 रुपये रोख जप्त केले होते. आरोपींनी हा गांजा देवी प्रसाद उर्फ देवा सिताराम डुकळे (वय-32 रा. उंडेगाव ता. परांडा, जि. धाराशिव) याच्याकडून आणून गौरव निर्मल (रा. रुपीनगर, चिखली) याला विकणार होते. याबाबत रावेत पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्यातील आरोपी देवी प्रसाद उर्फ देवा याचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता तो धाराशिव येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने उंडेगाव येथून आरोपी देवा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 50 लाख 20 हजार रुपये किंमतीचा 50 किलो 200 ग्रॅम गांजा जप्त केला. हा गांजा गौरव निर्मल (रा. रुपीनगर, चिखली) याला विकण्यासाठी आणला होता. आरोपी देवा गांजाची तस्करी करण्यासाठी अॅम्ब्युलन्सचा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून दोन अॅम्ब्युलन्स जप्त केल्या आहेत.

तसेच 13 जानेवारी रोजी पथकाने महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रायणी पार्क समोरील सर्व्हिस रोडवरुन सन्नीदेवल सिद्धनाथ शर्मा (वय-31), सन्नीदेवल भगवानदास भारती (वय-23 दोघे रा. रा. कुरुळी फाटा, मुळ रा. सराई गाढ ब्लॉक जि. सोनभद्र, उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 20 लाख 79 हजार 600 रुपयांचा 20 किलो 196 ग्रॅम गांजा जप्त केला. आरोपींनी हा गांजा उत्तर प्रदेशातील राजेश कुमार (रा. घोरावल) याच्याकडून आणल्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, राजन महाडीक, पोलीस अंमलदार बाळासाहेब सूर्यवंशी, जिलानी मोमीन, प्रदिप शेलार, राजेंद्र बांबळे, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, मनोज राठोड, संतोष भालेराव, अनिता यादव, विजय दौंडकर, प्रसाद कलाटे, अजित कुटे, प्रसाद जंगीलवाड, रणधीर माने, मितेश यादव, सदानंद रुद्राक्षे, अशोक गारगोटे, कपिलेश इगवे व पांडुरंग फुंदे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police ACP Transfers | पुणे पोलीस आयुक्तालयातील 6 सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

Pune Police Officer Suspended | 5 लाखाचे लाच प्रकरण ! वकीलाला लाच घेण्यासाठी प्रोत्साहित करणारा पोलिस अधिकारी तडकाफडकी निलंबीत