Pune Police ACP Transfers | पुणे पोलीस आयुक्तालयातील 6 सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणूक-2024 च्या पार्श्वभुमीवर पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी पोलीस आयुक्तालयातील 6 सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश मंगळवारी (दि.16) काढले आहेत. सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या (Pune Police ACP Transfers) केंद्रीय निवडणूक आयोग व पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आल्या आहेत.

बदल्या झालेल्या सहायक पोलीस आयुक्तांची नावे आणि त्यापुढील कंसात कुठून कोठे बदली झाले हे पुढील प्रमाणे…

  1. नंदा राजेंद्र पाराजे (मंदीनी वग्यानी) – (सहायक पोलीस आयुक्त, प्रशासन ते सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग)
  2. रुक्मिणी मनोहर गलंडे – (सहायक पोलीस आयुक्त, अभियान ते सहायक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग)
  3. अजय सुभाष चांदखेडे – (नव्याने हजर ते सहायक पोलीस आयुक्त, प्रशासन)
  4. मच्छिंद्र रामचंद्र खाडे – (सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा (प्रशासन) ते सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा (परिमंडळ-1)
  5. नारायण देवदास शिरगावकर – (सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग ते सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा (प्रशासन)
  6. अशोक विश्वासराव धुमाळ – (सहायक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग ते सहायक पोलीस आयुक्त, अभियान)

सहायक पोलीस आयुक्त, आस्थापना रंगनाथ बापू उंडे यांच्याकडे सहायक पोलीस आयुक्त, अभियान या पदाचा अतिरिक्त पदभार पुढील आदेश होईपर्यंत सोपवण्यात आला आहे.

सहायक पोलीस आयुक्त यांनी त्यांच्या पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरीत कार्यभार स्वीकारून अनुपालन अहवाल कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्रासह पोलीस आयुक्तलायत सादर करावा, असे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आदेशात नमूद केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

5 लाखाचे लाच प्रकरण ! वकीलाला लाच घेण्यासाठी प्रोत्साहित करणारा पोलिस अधिकारी तडकाफडकी निलंबीत