Pune Pimpri Chinchwad Crime News | किशोर आवारे हत्येचा बदला घेण्याचा कट उधळला ! 5 आरोपींना अटक करुन 7 पिस्टल, 21 काडतुसे जप्त

आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई, आतापर्यंत 11 टोळ्यांवर कारवाई

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष (Janseva Vikas Samiti Chairman) किशोर आवारे यांची भरदिवसा तळेगाव दाभाडे येथे गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करुन हत्या (Kishore Aware Murder Case) करण्यात आली होती. या हत्येचा बदला घेण्याचा कट रचणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी (PCPC Police) अटक (Arrest) करुन त्यांचा कट उधळून लावला. या कटातील पाच आरोपींना गुन्हे शाखेच्या (Crime Branch) दरोडा विरोधी पथकाने (Anti-Robbery Squad) अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 पिस्टल आणि 21 काडतुसे जप्त केली आहेत. आरोपी प्रमोद सांडभोर टोळीचे सदस्य असून पोलिसांनी आरोपींवर मोक्का (MCOCA Action) Mokka कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

किशोर आवारे यांच्या हत्येचा तपास करताना पोलिसांनी टोळी प्रमुख प्रमोद सोपान सांडभोर Pramod Sopan Sandbhor (वय-23 रा. हरणेश्वर वाडी, तळेगाव दाभाडे) आणि शरद मुरलीधर साळवी Sharad Muralidhar Salvi (वय-30 रा. काळेवाडी, पुणे, मुळ. बदनापुर, जालना) यांना तळेगाव एसटी स्टँड परिसरातून अटक केली. यावेळी त्यांच्याकडून अल्टो कार, 4 गावठी पिस्टल (Pistol) 14 जिवंत काडतुसे (Cartridges) जप्त करण्यात आली होती. त्यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम (PI Jitendra Kadam) करत होते. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींचे साथीदार अमित जयप्रकाश परदेशी Amit Jayaprakash Pardeshi (वय-31 रा. डोळसनाथ मंदीराशेजारी, तळेगाव दाभाडे), मंगेश भिमराव मोरे Mangesh Bhimrao More (वय-30 रा. माळी नगर, वडगाव मावळ) आणि अनिल वसंत पवार Anil Vasant Pawar (वय-39 रा. सिद्धार्थनगर, तळेगाव दाभाडे) यांना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींनी त्यांचे इतर दोन साथीदार अक्षय उर्फ आर्ची विनोद चौधरी Akshay alias Archi Vinod Choudhary (वय-28 रा. सिद्धार्थनगर, तळेगाव दाभाडे) आणि देवराज Devraj (रा. जळगाव जामोद, बुलढाणा) यांच्यासह मिळून किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्याचा कट केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींकडून 7 पिस्टल 21 जिवंत काडतुसे, एक लोखंडी कोयता, तलवार असा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक केलेले सर्व आरोपी सराईत

अटक करण्यात आलेले आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय (Pimpri Chinchwad Police Commissionerate), पुणे ग्रामीण (Pune Rural), अहमदनगर (Ahmednagar) येथील तळेगाव, कामशेत (Kamshet Police Station), चाकण (Chakan Police Station), वडगाव (Vadgaon Police Station) आणि कोपरगाव पोलीस ठाण्यात (Kopargaon Police Station) खून, खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, खंडणी, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमवुन गाड्यांची तोडफोड करुन जाळपोळ करणे तसेच बेकायदेशीर पिस्टल बाळगणे असे एकूण 26 गुन्हे दाखल आहेत.

टोळी प्रमुख प्रमोद सांडभोर याच्यावर तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, कामशेत पोलीस ठाण्यात सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. शरद साळी याच्यावर तळेगाव, कोपरगाव, चाकण येथे चार गुन्हे दाखल आहेत. अमित परदेशी, देवराज आणि अनिल पवार यांच्यावर तळेगाव पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. मंगेश मोरे याच्यावर तळेगाव कामशेत, वडगाव पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. अक्षय उर्फ आर्ची चौधरी याच्यावर तळेगाव, कोपरगाव येथे पाच गुन्हे दाखल आहेत.

आरोपींवर मोक्का कारवाई

प्रमोद सोपान सांडभोर हा टोळीप्रमुख तर अन्य आरोपी हे त्याच्या टोळीतील साथीदार आहेत. सर्व आरोपी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटीत गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 (मोक्का) नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव मंगळवारी (दि.4) अपर पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मान्यता देऊन आरोपींवर दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्का कायद्याचा अंतर्भाव करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सतीश माने (ACP Satish Mane) करीत आहेत. आज पर्य़ंत 11 गुन्हेगारी टोळ्यांमधील 139 आरोपींवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinoy Kumar Choubey), पोलीस सह आयुक्त संजय शिंदे (Addl CP Sanjay Shinde), अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (Addl CP Vasant Pardeshi), पोलीस उपायुक्त गुन्हे स्वप्ना गोरे (DCP Swapna Gore), पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 काकासाहेब डोळे (DCP Kakasaheb Dole), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सतिश माने, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर (ACP Balasaheb Kopner) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पीसीबी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत (PCB Senior PI Balkrishna Sawant), सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख (API Ambarish Deshmukh), पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, आशिष बनकर, प्रविण कांबळे, गणेश कोकणे, गणेश हिंगे, गणेश सावंत, विनोद वीर, सुमित देवकर, सागर शेडगे, महेश खांडे, उमेश पुलगम, प्रविण माने, राजेश कौशल्य, राहुल खारगे, समिर रासकर, नितीन लोखंडे, चिंतामण तुपे व अमर कदम यांच्या पथकाने केली.

Web Title :  Pune Pimpri Chinchwad Crime News | The plot to avenge the murder of Kishore Aware was foiled! 5 accused arrested and 7 pistols, 21 cartridges seized

Join our WhatsApp Group, Telegram,facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political Crisis | शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता भाजपमध्ये होणार मोठा भूकंप, पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर?

Deepak Mankar | राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) माजी उपमहापौर दीपक मानकर यांची पुणे शहराध्यक्षपदी निवड

Congress Leader On NCP Crisis | ‘मुलीला पुढे आणण्यासाठी कदाचित…’ राष्ट्रवादीमधील बंडखोरीवरुन काँग्रेस नेत्याचे मोठं विधान

Pune MCOCA Case | कर्वेनगर परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करणार्‍या पप्पुल्या वाघमारेसह 9 जणांवर ‘मोक्का’, CP रितेश कुमार यांची 33 वी कारवाई

Maharashtra Politics News | महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप?, राष्ट्रवादीनंतर ‘हा’ गट सत्तेत येणार; शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक विधान

Pune Pimpri Chinchwad Crime News | धक्कादायक ! मुलींच्या स्वच्छतागृहात CCTV कॅमेरा, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मुख्याध्यापकाला चोप